शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ

By admin | Published: September 14, 2016 12:43 AM

हिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड क्रमांक ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरत आहे

११० वर्षांची परंपरा : १९०५ मध्ये झाली स्थापना; गिरड येथील ५० वर्षे जुन्या गणेश मंडळाला एक गाव एक गणपतीचा मानरितेश वालदे बोरधरणहिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड क्रमांक ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरत आहे. या बाल गणेश मंडळाला ११० वर्षे पूर्ण झाले आहे. शतकोत्तर परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. १९०५ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली.हिंदू आणि मुस्लीम समाजातील युवकांनी एकत्र येत येथे जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. मंडळाचे सर्वच मुस्लीम सदस्य सर्व कार्यक्रमाला हजर राहत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांची असलेली उपस्थिती सर्वांना आकर्षित करणारी ठरत आहे.हिंगणी येथील हे एकमेव गणेश मंडळ असून एक गाव एक गणपतीची संकल्पना येथे आजतागायत कायम आहे. हिंगणी येथे गत काही वर्षांपूर्वी बाल गोपालांनी एकत्र येवून गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून कुंभारपूरा आखाडा येथील नारायण बोरसरे यांच्या घराच्या परिसरात गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली व्यवस्था आखाडा म्हणून ओळखली जाते. याच परिसरात असलेल्या कुंभारपूरा आखाड्याचे लोक वर्गणीतून काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले.या मंडळात बाल गोपालांचा मोठा सहभाग असतो. यामुळे या मंडळाला बाल गणेश मंडळ असे नाव अद्यापही कायम आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मुंडे तर उपाध्यक्ष गजानन वझे, शेख शाबीर, दिवाकर मोहर्ले, किशोर धाबर्डे, अमोल मुडे, भारत वझे, सतीश भजभुजे, अनिल मोहिजे, सतीश वाल्दे, शुभम किरडे, भारत किरडे आदींचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्रित येऊन सामाजिक एकोपा वाढीला लावण्याकरिता कार्यरत आहेत. या मंडळाचा ११० वर्षांपासून उत्साह आजही कायम असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसत आहे.मुस्लीम बांधवांचा सहभागशेख बशीर, शेख समीर, शेख युनूस, शेख जुबेर, मर्ती स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत ते प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. यातून हिंदू- मुस्लीम एकता जपली जात असून बाप्पाच्या भक्तीत तेही तल्लीन होतात. विधिवत पुजा व भव्य महाप्रसाद, साधपणाचे स्वरूप देण्यात आले. यंदा गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.