परवान्याचे नूतनीकरण नाही : पडलेल्या खड्ड्यांकडे खाण मालकांसह प्रशासनाचाही कानाडोळा रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धापक्की घरे व पक्क्या इमारती व सडका बनविण्याकरिता लागणारा दगड पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध भागात गिट्टी खाणी निर्माण केल्या. महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या या खाणी भाडेतत्त्वार देण्यात आल्या. या खाणीतून आवश्यक दगड काढण्याकरिता उत्खनण सुरू आहे. या उत्खनणात तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचत असून तयार झालेली खाणीतील ही कृत्रिम तळे आता मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे समोर आले आहे. या वर्षात बोरगाव (मेघे) येथील खदानीत तयार झालेल्या तळ्यात दोन युवकांचा मृत्यू झाला. या पूर्वीही येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत. गिट्टी खदानीतील खोदकाम झाल्यानंतर येथे तयार झालेल्या तलावाचा वापर मत्स्य उत्पादनाकरिता करता येईल, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र वर्धेत तयार झालेल्या गिट्टी खदानीत एकाही ठिकाणी असा तलाव असल्याची नोंद नाही. खोदकामामुळे तयार झालेले खड्डे खाण मालकाने महसुलच्या खणिकर्म विभागाशी संपर्क साधून शहरात साचलेला कचरा टाकून बुजविण्यासंदर्भात सन २०१३ मध्ये आदेश आले आहेत. याची माहिती खणिकर्म विभागाला आहे; मात्र ती माहिती खाण मालकांना नसून त्यांच्याकडून अशी कुठलीही मागणी या विभागात करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय परिसरात घडत असलेल्या घटनेची माहिती खाण मालकाने महसूल विभागाला देणे बंधणकारक असताना तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७९ खाणी आहेत. त्यातील बऱ्याच खाणींचे नुतणीकरण झाले नसतानाही त्यातून मोठ्या प्रमाणात उत्खणण सुरू आहे. एकूण खाणीपैकी ३३ खाणीच्या नुतनीकरणाचे पत्र आल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर १२ खाण मालकांकडून अद्याप कुठलेही अर्ज आले नाही. असे असतानाही त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वर्धेतील बऱ्याच खदानी कागदावर एकाच्या नावावर आहे तर तिथे काम मात्र दुसराच करीत असल्याचे वास्तव आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. खाणीतून उत्खनण करण्याकरिता खाणीला परवाना आवश्यक आहे. असे असताना वर्धेत मात्र तब्बल ३३ खाणींचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यांच्याकडून केवळ अर्ज आल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नव्या आदेशाला तिलांजलीखाणीत तयार होत असलेल्या खड्ड्यात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचत आहे. खड्डे मोठे असल्याने येथे मत्स्य उत्पादनाकरिता त्यांचा वापर करण्याचे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्ह्यातील ७९ खदानीपैकी एकाही खाणीत तसा तलाव नसल्याची नोंद शासन दरबारी आहे.उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचून तयार होणाऱ्या तलावात परिसरातील युवकांसह काही शाळकरी मुले पोहण्याकरिता जात असतात. यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता ही खड्डे बुजविण्याचा निर्णय शासनाच्यावतीने २०१३ मध्ये जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार एकाही खाण मालकाकडून तशर मागणी खनिकर्म विभागाकडून आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार गिट्टी खदानींचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार कार्यही सुरू आहे. चदान परिसरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती मालकाने महसूल विभागाला देणे गरजेचे आाहे. मात्र येथे तसे होत नाही. शिवाय तयार झालेल्या तलावात मत्स्य व्यवसाय करणे शक्य आहे. तसा निर्णयही आहे. मात्र वर्धेत तसे झाले नाही. पडत असलेले खड्डे बुजविण्यासंदर्भात २००३ मध्ये शासनाने नवा अद्यादेश काढला. यात शहरातील कचरा या खड्ड्यात टाकणे शक्य आहे. परंतु तशी कोणाकडून मागणीही करण्यात आली नाही. याची माहिती त्यांना आहे अथवा नाही याबात शंका आहे. -एस.के. बढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा
गिट्टी खदानी बनताहेत मृत्यूचे द्वार
By admin | Published: September 06, 2015 2:01 AM