लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर, यवतमाळ तसेच अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढले आहेत. परंतु, सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच ‘सेफझोन’ असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे.भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजी, दुध, मांस व फळ आणण्यास तसेच वर्धा जिल्ह्याबाहेर सदर जीवनावश्यक वस्तू पाठविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भाजीबाजार, फळ व मांस विक्रीचे दुकान दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहे. कुठल्याही परिस्थित नागरिकांनाची गैरसोय होणार नाही याची दक्षताही जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन मुबलकवर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. सध्या अनेक शेतकरी विविध भाजीपाला वर्गीय पिकांची नियमित तोड करून तो नाशवंत शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणत आहेत. तर काहींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या टमाटर, चवळी, वांगी, मिरची, वाल, काकडी, भेंडी, ढेमस, पालक, संभार, कांदा, शेवगा, पत्ताकोबी व फुलकोबीचे उत्पादन होत असून हा शेतमाल शेतकऱ्यांच्या शेताच्या धुºयावरून थेट बाजारपेठेपर्यंत कसा येईल यासाठीही विशेष प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.कृषी विभागाच्या खांद्यावर जबाबदारीजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील भाजीपाला वर्धा जिल्ह्यात येणार नसला तरी वर्धा जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होत असलेला भाजीपाला नियमित बाजारपठेपर्यंत कसा पोहोचेल याची जबाबदारी कृषी विभागावर राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने मंगळवारी बैठकही पार पडली.शहरात ११ ठिकाणी मिळणार भाजीपालावर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरूवातीला केवळ दोनच ठिकाणी भाजीबाजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता मानस मंदिर येथील मैदान, सानेगुरुजीनगर भागातील साई मंदिर परिसर, केळकरवाडी भागात डॉ. वाणी यांच्या घराजवळील मैदान, गांधीनगर भागात विकास विद्यालयाचे मैदान, लक्ष्मीनगर येथे हनुमान मंदिर परिसर, महादेवपुरा भागात महादेव मंदिर परिसर तसेच बजरंग विहीर, स्वावलंबी विद्यालयाचे मैदान, रामनगर भागात सर्कस मैदान, कृष्णनगर येथे गाडगेबाबा मठ शेजारील मैदान, बोरगाव (मेघे) परिसरात जिनिंग फॅक्टरी मैदान तसेच पुलफैल भागातील लालालचपत रॉय शाळेच्या मैदानावर भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वर्धा नगर पालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करूनच नागरिकांनी भाजीची खरेदी करावी, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.नागपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने पुढील सात दिवस वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध व फळे इतर जिल्ह्यातून आणण्यास तसेच सदर जीवनावश्यक वस्तू वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय थोडा कठोर असला तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.
बाहेर जिल्ह्यातून दूध, फळे, भाजीपाला आणण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM
भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : १४ एप्रिलपर्यंत लागू राहणार बंधने