लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीचे प्रतिबंधित बियाणे आणून त्याची पेरणी केली जात असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामणी शिवारात छापा टाकला असता आरोपींनी घटना स्थळावरून यशस्वी पळ काढला. असे असले तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित असलेले कपाशीच्या बियाण्यांचे १२ पाकिट घटना स्थळावरून जप्त केले आहे. ही कारवाई सुधीर देशपांडे यांच्या शेतात करण्यात आली. त्यांनी हे शेत गोजी येथील प्रविण कवडू गुळघाने यांना शेती करण्यासाठी ठेक्याने दिल्याचे अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.प्रतिबंधित बियाणे आणून काही मजुरांना हाताशी घेऊन झटपट पेरणी आटोपल्या जात असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे जि.प.च्या कृषी विकास अधिकारी अश्विनी भोपळे, मोहीम अधिकारी संजय बमनोटे, पं. स. हिंगणघाटचे कृषी अधिकारी तथा नियंत्रण निरीक्षक महेंद्र डेहनकर यांनी मौजा जामणी परिसरातील सुधीर देशपांडे यांच्या शेत गाठले. दरम्यान शासकीय अधिकारी येत असल्याचे लक्षात येताच प्रविण गुळघाने याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाची बारवाईने पाहणी केली असता घटनास्थळी प्रतिबंधित असलेले कपाशीच्या बियाण्यांची १२ पाकिट आढले. ते आणि इतर बियाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. शिवाय बियाण्यांचे नमुने विश्लेशनासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
प्रतिबंधित बियाणे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:37 PM
कपाशीचे प्रतिबंधित बियाणे आणून त्याची पेरणी केली जात असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामणी शिवारात छापा टाकला असता आरोपींनी घटना स्थळावरून यशस्वी पळ काढला.
ठळक मुद्देमजुरांकडून सुरू होती पेरणी : अधिकाऱ्यांचे पथक येताच आरोपी पसार