लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आली. बापू कुटी समोर प्रार्थना आणि अखंड सूत्रयज्ञाला आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसुम पांडे, नथ्थूजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, पवन गणवार यांनी सूतकताईला सुरूवात केली. सायंकाळी उशीरापर्यंत एकूण ३४ हजार मीटर सूत कताई करून महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.सेवाग्राम आश्रम, नई तालिम समिती व गांधी सेवा संघच्या कार्यकर्त्यांसह गांधीजींना माणनाऱ्यांनी या सूत कताईच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिवाय आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी टकळी, पेटी चरखा व किसान चरख्यावर तूर कताई केली. सायंकाळी अर्धा तास प्रार्थना भूमिवर सामूहिक सूतकताई करण्यात आली. रात्रीला एक तासाचे बापू कुटी वरांड्यात सर्व धर्म भजन पार पडली. यात आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, हिरा शर्मा, जालंधरनाथ, नामदेव ढोले, बाबा खैरकार, विजय धुमाळे, सिद्धेश्वर उंबरकर, प्रशांत ताकसांडे, पंडित चन्नोळे, रूपेश कडू, दक्षिण आफ्रिकेचे मोहन भाई हिरा, योगेश माथुरिया, संजय बाफना, धर्मेंद्र राजपूत, शोभा कवाडकर, सुचित्रा झाडे, प्रभा शहाने, इस्लाम हुसैन, रिटा हुसैन, सुधाकर ताकसांडे, नंदू गावंडे आदी सहभागी झाले होते.उपवास ठेवून अर्पण केली जातेय श्रद्धांजलीजेष्ठ गांधीवादी कुसुम पांडे आणि नथ्थुजी चव्हाण हे गांधीजींच्या पुण्यतिथीला उपवास करतात. कुसूम पांडे या मागील ७० वर्षांपासून ३० जानेवारीला हा उपवास करून तर चव्हाण हे सुमारे २० वर्षांपासून उपवास करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतात.
३४ हजार मीटर सूत कताईतून बापूंना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:28 AM
सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आली.
ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमातील ७१ वे अखंड सूत्रयज्ञ : अनेकांनी घेतला उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग