शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सूत्रयज्ञातून बापूंना केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:34 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.

ठळक मुद्देरक्षा विसर्जनदिन : सर्वधर्म प्रार्थनेला अनेकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.महात्मा गांधीजींची हत्या दिल्ली येथे ३० जानेवारी १९४८ ला झाली. भारतीय पंरपरेप्रमाणे तेरवीची प्रथा आहे; पण बापूंनी अशा गोष्टींना आपल्या जीवनात महत्त्व दिले नव्हते. दिल्लीवरून गांधीजींच्या अस्ती आश्रमात त्यावेळी आणण्यात आल्या होत्या. त्याप्रसंगी भारताचे गव्हर्नर मंगलदास पकवासा हे सुद्धा आश्रमात आले होते. आश्रमातून १२ फेब्रुवारी १९४८ ला अस्तीकलश पवनारच्या धामनदीवर आश्रमचे कार्यकर्ते, नई तालिमचे ई. डब्लू. आर्यनायकम्, आशादेवी, शंकर पांडे आदींच्या उपस्थितीत नेण्यात आला होता. त्या ठिकाणी गव्हर्नर मंगलदास पकवासा यांच्यासह आदींच्या हस्ते बापूंच्या अस्ती धामनदीत विसर्जीत करण्यात आल्या. तेव्हापासून १२ फेब्रुवारी हा रक्षा विसर्जनदिन म्हणून पाळल्या जातो. मंगळवारी बापूकुटीच्या आवारात सूत्रयज्ञ पार पडला. त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना, गिताई वाचन आणि इशोपनिषद झाले. याप्रसंगी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे, शोभा कवाडकर, अश्विनी बघेल, प्रभा शहाने, रिता हुसैन, जालंधरनाथ, बाबा खैरकार, नामदेव ढोले, प्रशांत ताकसांडे, मिथून हरडे, सिद्धेश्वर उंबरकर, सचिन हुडे, इस्माईल हुसैन आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम