लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये आठ प्रकारच्या सूत्रांचा वापर करुन मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. काही पंचायत समितीमध्ये राज्य शासन निर्णयातील वेतन संरचना निश्चितीच्या अनुषंगाने असलेल्या सूचनांचा आधार घेण्यात आला. तर काही पंचायत समितीत कर्मचाऱ्यांनी आपली बाबूगिरी दाखवून स्वत: चा विकल्प चालविला, असा सावळा गोंधळ सुरु असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक संघाने केला असून याबाबत जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी शेळके यांना निवेदन देऊन चर्चा केली.सातव्या वेतन आयोगानुसार जिल्ह्यातील पंचायत समितीमधील विविधता, त्रुटी व वेतन यावर शासन निर्णयातील सूचनांचा आधार घेत चर्चा करण्यात आली. १ जानेवारी २०१६ नंतर ज्यांचे वेतनश्रेणी लाभामुळे ग्रेड पे बदलले त्या शिक्षकावर अन्याय होऊ नये. त्यांचे वेतन निश्चिती होत असताना काही पंचायत समिती मध्ये वेगळ्या पद्धतीने तर काही पंचायत समितीमध्ये वेगळे वेतन निश्चिती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सेवा कनिष्ठ असलेल्या शिक्षक बांधवांना सेवेत वरिष्ठ असलेल्या शिक्षकांपेक्षा जास्त वेतन मिळत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे यांच्यासह आर्वी विभाग प्रमुख धनंजय केचे, हिंगणघाट विभाग प्रमुख अजय गावंडे, वर्धा विभाग प्रमुख अरुण झोटिंग, हिंगणघाट तालुकाध्यक्ष पंढरी तडस, वर्धा तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शिक्षकांच्या वेतन निश्चितीत सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:25 PM
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये आठ प्रकारच्या सूत्रांचा वापर करुन मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. काही पंचायत समितीमध्ये राज्य शासन निर्णयातील वेतन संरचना निश्चितीच्या अनुषंगाने असलेल्या सूचनांचा आधार घेण्यात आला.
ठळक मुद्देशिक्षक संघाचा आरोप । वित्त अधिकाऱ्यांना निवेदन