लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या पुढाकार साटोडा या गावात कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे गावातील १६ महिलांना रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. ‘कॉटन टू क्लॉथ’ ही संकल्पना साकारणारा हा प्रकल्प शेतकºयांना निश्चितच आधार देणारा ठरणार आहे.विदर्भात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण, शेतकºयांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकºयांच्या मालकीच्या सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नसल्याने त्यांना पिकविलेला कापूस व्यापाºयांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही प्रथा आजही कायम आहे. शेतकºयांच्या या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी स्थापन झालेला केम प्रकल्प यासाठी काम करीत आहे. शेतकºयांना विविध शेतीपूरक उद्योगासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी बचत गटाच्या दालमील, शेळीपालन, मशरूम शेती, शेतकºयांचा उत्पादन खर्च कमी करणे व शेतकºयांनी कापूस व्यापाºयांना विकता कापूस गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य याचा समावेश आहे. गत दोन वर्षापासून १० गावातील शेतकरी स्वत:च कापूस गाठी तयार करून विकत आहेत. परंतु, यातील नफ्याचे खरे गणित कापड व वस्त्रे तयार करण्यात आले. हे लक्षात घेऊन कॉटन टू क्लॉथ या संकलपनेवर काम करण्यास केमने सुरूवात केली आहे.वर्धा शहरानजीकच्या साटोडा येथे विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भीमाई या महिला बचत गटाच्या २० महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहे. महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विधायक कृतीशील कार्यापासून प्रेरणा घेऊन निवेदिता निलंयम ही संस्था काम करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी या महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तर केमसाठी हातमाग युनिटही तयार करून दिले. केमने ३० टक्के अनुदानावर ४ हातमाग युनिट या गावात स्थापन केले आहे. एका युनिटची किंमत ३ लाख रूपये असून यासाठी समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी व ग्लोबल इंटरप्रायजेस यांनी सहकार्य केले आहे. दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आॅगस्ट महिन्यापासून १६ महिलांनी ५०० मीटर खादी कापड तयार केले. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी व ग्लोबल इंटरप्रायजेस या कंपनीला तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे १५० रूपये प्रति मिटरने खादी कापड विकला जात आहे. यामुळे महिलांना २०० रूपये प्रतिदिनाची मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणाºया नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. याच गावात आणखी ७ हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असून आणखी २८ महिलांना रोजगारांची संधी गावातच मिळणार आहे. शिवाय गावातील शेतकºयांना या हंगामात कापूस व्यापाºयांना विकण्याऐवजी थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.शेतकºयांना एक क्विंटल कापसाचे हमीभावाप्रमाणे ५ ते ६ हजार रूपये मिळतात. पण, त्यावर प्रक्रिया करून थेट खादी कापड विकला तर याच्या चारपट म्हणजे सुमारे २३ हजार रूपये नफा खर्च वजा जाता मिळू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी याचा फायदा करून घ्यावा.- निलेश वावरे, समन्वयक, कृषी विकास प्रकल्प, वर्धा.
‘कॉटन टू क्लॉथ’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:26 PM
कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या पुढाकार साटोडा या गावात कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
ठळक मुद्देसाटोडा येथे कापड निर्मिती केंद्र : महिलांना देणार रोजगारभिमुख प्रशिक्षण