आॅनलाईन लोकमतआर्वी : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे. तेथेही शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आले. सेवाग्राम आश्रमात शेतकरी आरक्षणाची सुरूवात शेतकरी व मिशनचे प्रमुख शैलेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शविल्याने या लढ्याला बळकटी मिळाली आहे.शैलेश अग्रवाल यांनी सोप्या पद्धतीने मांडलेल्या शेतकरी आरक्षण विषयाला शेतकऱ्यांनी स्वीकारले. शेकडो ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठरावही घेतला. शासनातील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आले. हा लढा सर्वत्र जोर धरत असताना खुद्द शरद पवार यांनी शेतकऱ्याला आरक्षण मिळावे, असे सांगितले. आता नेतेही शेतकरी आरक्षणाच्या बाजूने असल्याचे हे चित्र ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ हा लढा अधिक मजबूत करणारे आहे.वास्तविक, आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजपर्यंत जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले. एकच मिशनने त्या पलीकडे जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया शेतीची व शेतकऱ्यांची होणारी दयनीय स्थिती रोखण्यासाठी कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशात ‘जय जवान, जय किसान’, हा जुना नारा आहे. यातील सीमेवर लढणाऱ्या जवानाला आरक्षण आहे. मग, शेतात लढाणऱ्या शेतकऱ्याला आरक्षण का नाही, हा सामान्य शेतकऱ्याचा असामान्य प्रश्न एकच मिशनने हेरला आहे. सेवाग्राम येथून सुरू झालेला हा लढा उत्तरेतील हरियाणापर्यंत पोहोचला आहे. हरियाणातील एका गावात ग्रामसभा घेऊन शेतकऱ्याला आरक्षण मिळाले पाहिजे, असा ठराव घेतला आहे.अग्रवाल यांनी मंत्रालयात पोहोचून अनेक मंत्र्यांना आपल्या शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला. काहींनी त्यावर चर्चा केली. काही मंत्र्यांनी प्रस्ताव ठेऊन घेतला तर काहींनी नुसताच पाहून हे शक्य नसल्याची प्रतिक्रियाही दिली; पण आता शेतकरी आरक्षणावर नेते बोलते झाले आहेत. शेतकºयाला आरक्षण मिळाले पाहिजे, तो त्याचा हक्क आहे, अशी मागणी एकच मिशनच्यावतीने सतत लावून धरली जात आहे.आता खुद्द देशाच्या माजी कृषी मंत्र्यांनी शेतकरी आरक्षण मिळाले पाहिजे, असे मुंबई येथील पत्रकार परिषदेत सांगितले. ते एकप्रकारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या मुद्याचे समर्थनच म्हणावे लागेल. हा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देशपातळीवर शेतकºयांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. आता नेत्यांच्या तोंडी ही मागणी येत असल्याने शेतकरी आरक्षण हा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता जोरकस प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त होत आहे.अमरावती, वर्धा जिल्ह्यातही ठरावअमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांना आरक्षण मिळावे, असे ठराव घेण्यात आलेले आहेत. हे ठराव कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा ग्रामपंचायींद्वारे ग्रामसभांमध्ये घेण्यात आले आहेत. सदर ठरावंच्या प्रती शासन तथा वरिष्ठ मंत्र्यांना सादर करण्यात आल्या आहेत. यातूनच माजी कृषी मंत्र्यांनीही शेतकऱ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा उल्लेख केला. यामुळे भविष्यात या आंदोलनाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
वर्धेतील लढा हरियाणाच्या गावापर्यंत पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:24 PM
शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे.
ठळक मुद्देएक वर्षातच मिळाले फलित : एकच मिशन शेतकरी आरक्षण लढ्याला बळकटी