लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळण-वळणासाठी सोईचे ठरतात. असे असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. तरुणांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत: सोबत कुंटूबीय व इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वाहतूक सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, आजच्या काळात अपघाताने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यू होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नवीन कायद्यासोबतच दंड व शिक्षेतही वाढ केली आहे. या कायद्यातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुसऱ्याच्या जीवाचाही विचार करावा असेही यावेळी खा. तडस यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी केले तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.नव्या वाहतूक कायद्याची जनजागृती करा : जिल्हाधिकारीपरिवार हा आयुष्याचा केंद्र बिंदू आहे. आपली एक चूक दुसºयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गाच्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडताना तसेच वाहन चालविताना दक्ष राहिले पाहिजे. केंद्र शासनाने केलेल्या नवीन वाहतूकीच्या नियमाची संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी. अपघातास कारणीभूत ठरल्यास शिक्षा होऊ शकते, याची माहितीही अधिकाºयांनी नागरिकांना पटवून द्यावी, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले.अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करणार - तेलीदरवर्षी अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष शासनाचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात यंदा ६ टक्के अपघात कमी झाले आहेत. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व माल लादून वाहतूक करणे तसेच वेगाने वाहन चालविणे या छोट्या-छोट्या बाबी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.
वाहन चालविताना कुंटूंबाच्या जबाबदारीचे भान ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:22 AM
व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते.
ठळक मुद्देरामदास तडस : वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन