लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने केवळ आजारी व्यक्ती आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्ती यांनीच मास्क लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. नंतरच्या काळात मास्क वापरणे सर्वांसाठीच बंधकारक करण्यात आले. त्यातच एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे.एन-९५ फिल्टर, एन-९५ विदाऊट फिल्टर, सर्जिकल, डबल लेअर, फाईव्ह लेअर मास्क, केएन-९५, पोल्यूशन मास्क आदी अनेक मास्कचे विविध प्रकार आहेत. मात्र, आता शहरात एन-९५ या मास्कचा वापर अधिक होत आहे. त्यातच बाजारात सर्जिकल ग्रीन मास्कचा वापरही अधिक आहे.एन-९५ या मास्कची मागणी वाढल्याने उत्पादनही वाढले आहे. सध्या १२० ते २०० रुपयांपर्यंत हा मास्क मिळतो. मात्र, बºयाच ठिकाणी आता एन-९५ च्या जागेवर बनावट मास्कही दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर शहरातील रस्त्यांवरही स्टॉल लावून बनावट मास्कची विक्री होत असल्याचे चित्र आहे.चार - आठ दिवस मास्क वापरुन तो टाकून दिला जातो. त्यामुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती आहे. वापरकर्त्यांनी मास्क वापरून झाल्यानंतर तो जाळून नष्ट करणे, किंवा वॉशेबल मास्क घेवून तो धुवून पुन्हा वापरणे अपेक्षित आहे.मार्च-एप्रिल महिन्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी एन-९५ मास्क वापरावा, असे शासनाने सांगितले होते. रुग्ण व बाधितांच्या थेट संपर्कात येणाºया आरोग्य कर्मचाºयांसाठी तसेच हाय रिस्कमधील व्यक्तींसाठी एन-९५ मास्क वापरला गेला. मात्र, एन-९५ व नामसदृष्य के-९५, केएन-९५ असे मास्कही मिळायला लागले आहेत. एन-९५ म्हणून अन्य मास्कचीही विक्री केली जात आहे. याची प्रशासनाने दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.असा ओळखा खरा एन-९५ मास्कअस्सल एन-९५ मास्क हा तीन लेअरच्या कपड्यापासून तयार केला जातो. या मास्कच्या सोबत आतील भागात आरोग्याविषयीची सूचना नमूद असते. यासोबतच मास्कनिर्मिती करणाºया कंपनीची संपूर्ण माहिती व संपर्क क्रमांकही दिला जातो. ग्राहक या क्रमांकावर संपर्क साधून मास्क बाबत माहिती जाणून घेऊ शकतो, किंवा काही तक्रार असेल तर करु शकतो. इतर बनावट मास्कमध्ये ही माहिती नसते.एन-९५ च्या मास्कची अधीकृत किंमत अडीशचे रुपये असून बाजारपेठेते तो मास्क १२० ते १३0 रुपयांला विक्रीस आहे. याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. कुणीही एमआरपीपेक्षा जास्त दरात मास्क विकू शकत नाही. मात्र, क्वालीटी कंट्रोलवर लक्ष देण्याची गरज आहे.- नवल मानधनिया, अध्यक्ष केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन वर्धाएन-९५ चे मास्क केवळ रु ग्ण आणि डॉक्टरांनाच वापरायचे असून शहरातील मेडीकलमध्ये मिळणाºया मास्कचे दर वधारले आहे. शासनाने याची दखल घेत हे मास्क नागरिकांना ३० ते ४० रुपयांत उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- डॉ. संजय मोगरे, अध्यक्ष आयएमएखºया मास्कच्या आतमध्ये आत्मनिर्भरचा उल्लेखकोरोनाच्या पूर्वी एन-९५ मास्कचे उत्पादन अल्प होते. कोरोनानंतर आता आत्मनिर्भर भारत असे लिहिलेले व राज्यातच निर्मिती झालेले एन- ९५ मास्कही विक्रीसाठी आले आहेत. सर्वसामान्यही एन-९५ च्या नावाने इतर बनावट मास्क खरेदी करत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.
सावधान! मास्कचा काळाबाजार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:00 AM
एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे.
ठळक मुद्देसंसर्गाचा धोका : ठिकठिकाणी मुखपट्टी विक्रीचे थाटले स्टॉल