शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कीटकजन्य आजारापासून सावध राहा

By admin | Published: October 12, 2014 11:49 PM

ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग याशिवाय कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. कोणताही ताप आल्यास तपासणी करुन घ्यावी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी,

वर्धा : ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग याशिवाय कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. कोणताही ताप आल्यास तपासणी करुन घ्यावी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, अंगावर पुरळ येणे, तापामध्ये चढउतार अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन निदान करावे. सावधगिरी बाळगणे हाच आजावरील प्रभावी उपचार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात डेंगी जनजागरण मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र खरागंणा (मो.) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये डेंग्यू आजारावरील प्रतिबंधात्मक उपयांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. झोपाटे यांनी नागरिकांना माहिती दिली. डेंगी सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करण्याचे आवाहन केले.खरागंणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप पाहता सर्व ग्रामपंचायतीत भेटी देवून मार्गदर्शन केले. डेंगीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून डासांच्या उत्पतीची स्थाने असलेले पिण्याच्या पाण्याची भांडी, टाके, माठ, रांजण व टाक्या, तुडूब भरलेल्या नाल्या, कुंड, कुलर यांची स्वच्छता करून एकदा उन्हात कोरडे करावे. यासह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितले.येथील स्वावलंबी विद्यालयाच्या पथकाने कीटकजन्य व जलजन्य आजारांविषयी पथनाट्यातून जागृती केली. डासांच्या दंशापासून स्वत: चा बचाव करा असा संदेश दिला. यानंतर मान्यवरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घरी स्वच्छता मोहिम राबवावी. एक लहानसा मच्छर म म्हणजे मारणारा, छ म्हणजे छळणारा आणि र म्हणजे रयतेला असा हा मच्छर मनुष्याचे प्राण हरण करतो अशी माहिती दिली. यावेळी नागरिकांना कीटकजन्य आजारावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य चमुने केले.(स्थानिक प्रतिनिधी)