आॅनलाईन लोकमतदेवळी : राज्यातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या-छोट्या उद्योगांना चालना देणारे अनेक उपक्रम कार्यान्वीत करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. राजेश बकाणे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात हा प्रयत्न होत आहे, असे विचार राज्याचे उद्योग व बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त करून युवकांनी रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे असे आवाहन त्यांनी केले.कानगाव येथे आयोजित भाजपाच्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे व अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, देवळीच्या पं.स. सभापती विद्या भुजाडे व प्रशांत इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.मेळाव्यात कानगाव परिसरातील दहावी, बारावी, आयटीआय, पॉलीटेक्नीक, इंजिनिअरींग, एमबीए तसेच विविध शैक्षणिक पात्रतेच्या युवक-युवतींची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. रोजगाराभिमुख अनेक बाबी या मेळाव्यात हाताळून समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच अनेकांना रोजगाराची संधी देण्यात आली. कानगाव परिसरात रोजगाराचा प्रश्न लक्षात घेवून तसेच याठिकाणी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अनेक युवक-युवतींना संधी देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, असे विचार भाजपाचे जिल्हाध्यक्ष बकाणे यांनी व्यक्त केले. सुशिक्षीत बेरोजगारासोबतच मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला आहे, असे विचार आ.कुणावार यांनी व्यक्त केले. बेरोजगाराचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला आहे, असे विचार आ. डॉ. भोयर यांनी व्यक्त केला.याप्रसंगी थेट जनतेतून निवडून आलेल्या लहान आर्वी, पोटी, काचनगाव व इतर गावातील सरपंचाचा ना. पोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल चोपडा यांनी केले तर आभार पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी केले. याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकुर, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, राजू पोहणकर, श्याम शंभरकर, राजू टिचकुले, शैलेश देशमुख, परशुराम ठोंबरे, दिलीप फुकट, त्र्यंबक तळवेकर, बंडू वालदे, नितीन चंदनखेडे, कृष्णा मांडवकर, प्रमोद वनकर तसेच पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:29 PM
राज्यातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या-छोट्या उद्योगांना चालना देणारे अनेक उपक्रम कार्यान्वीत करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.
ठळक मुद्देप्रवीण पोटे : कानगाव येथील भाजपाचा रोजगार मेळावा