लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व थोर पुरुषांनी विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले, हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती व लेखनाद्वारे वेळोवेळी प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक कार्यातून व साहित्यातून आलेल्या प्रबोधन विचारांचा अंगिकार करा व प्रबोधनातून बनून त्यांचे विचार व कार्य गावागावात पोहचवा आणि देशातील प्रत्येक गाव समृद्ध करा असे आवाहन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय बोबडे यांनी शिबिरात उपस्थित स्वयंसेवकांना केले.स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने करंजी (भोगे) येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आयोजित शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. उत्तम पारेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून करंजी (भोगे) गावचे उपसरपंच सुनील भोगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. धनंजय सोनटक्के, पोलीस पाटील धनराज बलवीर, विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती मनोहर दोड, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय नवघरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. अरूण हरले, खोडे उपस्थित होते.डॉ. बोबडे पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना हीच मुळात सेवेच्या उद्देशाने निर्माण झाली आहे. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन मानवतावाद, साक्षरता, स्त्री पुरूष समानता, संविधान जागर इत्यादीबाबत लोकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे विचारही त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रतिनिधीक स्वरूपात गौरव तामगाडगे, प्रकाश हुलके, विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय नवघरे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील आपले अनुभव सांगितले. प्रास्ताविकातून प्रा. अरूणा हरले यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व गावकºयांनी ग्रामस्वच्छतेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. संचालन आचले मेघरे यांनी केले तर आभार भोजराज आंबटकर यांनी मानले.
प्रबोधनदूत बनून थोरांचे संदेश गावापर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:58 PM
सर्व थोर पुरुषांनी विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले, हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती व लेखनाद्वारे वेळोवेळी प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक कार्यातून व साहित्यातून आलेल्या प्रबोधन विचारांचा अंगिकार करा........
ठळक मुद्देविजय बोबडे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना आवाहन