शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नफेखोरांना देवळीत मिळतो दिलासा

By admin | Published: June 11, 2017 12:42 AM

या ना त्या कारणात येथील नाफेडची तूर खरेदी चांगलीच चर्चेत आली आहे. खरेदीच्या प्रारंभीलाच देवळी

तूर खरेदीत अनागोंदी : चुकाऱ्यांकरिता कास्तकारांची पायपीट लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : या ना त्या कारणात येथील नाफेडची तूर खरेदी चांगलीच चर्चेत आली आहे. खरेदीच्या प्रारंभीलाच देवळी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वत:चे गोदाम नाफेडच्या तूर खरेदीत खाली केले. यामध्ये खऱ्या कास्तकारांना उपेक्षीत ठेवून लाखोंचा मलीदा घश्यात उतरविला. आता पुन्हा नव्याने तालुक्याचे बाहेरील व्यापाऱ्यांचे ट्रक याठिकाणी खाली होत असल्याचे बोलले जात आहे. तूर मोजणारे हमाल सुद्धा व्यापाऱ्यांचेच असल्याने सर्व काही बिन बोभाटपणे सुरू आहे. खवीस पदाधिकाऱ्यांचा यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असल्याने या व्यवहारातून खरेदीचे सोपस्कर पूर्ण होत असल्याचा आरोप होत आहे. आजपावेतो तालुक्यातील देवळी व पुलगाव केंद्रावर नाफेडची ४५ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. यामध्ये देवळी केंद्रावर १८ हजार व पुलगाव केंद्रावर २७ हजार क्विंटलची आवक आहे. या आधी देवळी येथे टोकण दिलेल्या ८४१ कास्तकारांची तूर खरेदी करण्यात आली आहे. आता नव्याने ८४२ ते १ हजार ७४० पर्यंतच्या कास्तकारांना टोकण देण्यात आले असून या सर्वांची ५ जून पासून खरेदी सुरू झाली आहे. यासर्व टोकण धारकात सर्वात जास्त नफाखोर व्यापाऱ्यांचाच भरणा असल्याची चर्चा आहे. जवळच्या कास्तकारांचे सातबारा व आवश्यक कागदपत्रे घेवून हा गोरखधंदा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी काही खवीस पदाधिकाऱ्यांची होत असलेली धावपळ बोलकी ठरत आहे. नाफेडची तूर खरेदी ९ जूनपर्यंत करण्यात आली. परंतु धनादेश मात्र १९ एप्रिल पर्यंतचे देण्यात येत असल्याने गरजू कास्तकार अडचणीत सापडला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने त्याने धनादेशासाठी खरेदी विक्री समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहे. देवळी बाजार समितीच्या आवारात खविसच्यावतीने येत असलेल्या धनादेशात व्यापाऱ्यांचाच बोलबाला असल्याचे कास्तकार बोलत आहे. ज्या कास्तकारांच्या नावाने तुरी लावण्यात आल्या अशांचे धनादेश व्यापाऱ्यांच्या घरी पोहचता होत आहे. शासनाने नाफेडच्या माध्यमातून नफाखोर व्यापाऱ्यांची घरे भरली असल्याच्या प्रतिक्रीया आहेत.