लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : स्थानिक गावाच्या मध्यभागातून गेलेल्या नदी पात्राला जलपर्णी व बेशरमाच्या झाडांचा विळखा असल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर नदीचे पात्रही झुडपांमुळे अरुंद झाले आहे. येत्या काही दिवसात पावसाला सुरूवात होणार असून पावसाचे पाणी थेट काहींच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नदी पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.बेशरमाची झुडपे व जलपर्णीमुळे नदीचे पात्रच बुजले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पुराचे पाणी जुन्या वस्तीमधील काही नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. याच नदीच्या काठावर काहींनी घर बांधली आहे. जोरदार पाऊस आल्यावर ऐरवी नदीने वाहून जाणाने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसणार आहे. काही वर्षांपूर्वी पुराचे पाणी जुन्या वस्तीतील काहींच्या घरात घुसले होते. शिवाय अनेकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्याचे नुकसानही झाले होते. तत्कालीन आ. दादाराव केचे यांनी त्यावेळी आमदार निधीतून नदीचे खोलीकरण व नदीवरील पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम केले होते. त्यामुळे पुरामुळे होणारा धोका टळला होता. मात्र, सध्या याच नदीत बेशरम व जलपर्णीमुळे पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निमार्ण झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी तालुका प्रशासनाने तात्काळ नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.
तळेगावात नदी पात्राला बेशरम व जलपर्णीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:52 PM
स्थानिक गावाच्या मध्यभागातून गेलेल्या नदी पात्राला जलपर्णी व बेशरमाच्या झाडांचा विळखा असल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर नदीचे पात्रही झुडपांमुळे अरुंद झाले आहे.
ठळक मुद्देपावसाचे पाणी घरांमध्ये घुसण्याची भीती : नदी पात्राची साफसफाई करण्याची ग्रामस्यांची मागणी