शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

बेरोजगारांनो सावधान...! डमी वेबसाईटद्वारा घातला जाऊ शकतो गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 3:57 PM

Wardha News लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांचे वर्क फ्राॅम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारी फोफावतेय नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांचे वर्क फ्राॅम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. शहरासह नोकरीच्या आमिषातून ऑनलाईन गंडविल्याचे प्रकार समोर येत असतानाच नागरिकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केलेले आहे.

लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकरीच्या शोधात अनेकांनी क्विकर जॉबसारखे अप्लिकेशन किंवा जॉब मिळवून देणाऱ्या ज्या ऑनलाईन कंपनी आहेत त्या कंपनीकडे नोकरीसाठी अप्लाय केले आहे. अनेक जण मोबाईल किंवा मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करतात. त्यांना आपली वैयक्तिक माहिती देतात अनेकांना आता नोकरीबाबचा कॉल येईल असे वाटत असते. पण, त्यांच्या बॅंक खात्यातून लाखोंची रक्कम परस्पर काढून घेण्यात येते. मोबाईल क्रमांक बॅंक अकाऊंटशी कनेक्ट असल्याने अशांची फसवणूक होते.

जिल्ह्यातही लॉकडाऊन काळात अशा घटना घडल्या असून नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविल्याच्या घटना समोर आल्यात. काहींनी पोलिसात तक्रार दिली तर काहींनी बदनामी खातर पोलिसात जाणे टाळले. इतरही प्रकारे नागरिकांनी सायबर भामट्यांकडून फसवणूक करण्यात येत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहून कुठलीही वैयक्तिक माहिती, ओटीपी क्रमांक कुणालाही देऊ नये, नोकरीसाठी कॉल आल्यास संबंधित कंपनीशी संपर्क करून तसेच योग्य खातरजमा करूनच माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून तसेच सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

अशी करा खातरजमा...

१-- कुठलीही कंपनी इंटरव्ह्यूशिवाय नोकरी किंवा ट्रेनिंग देत नाहीत. तसेच ऑफर लेटरही मेल करीत नाहीत. तेव्हा अशाप्रकारच्या ईमेल्सना उत्तर देणे टाळावे.

२--कुठलीही कंपनी, बॅंक, फायनान्शिअल संस्था विनाकारण कुणालाही बक्षीस देत नाही. शक्यतो अशी ईमेल्स स्पॅमपध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु, शेवटी ती एक यंत्रणा आहे त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात. आपण मात्र, सावध राहणे आवश्यक आहे.

३ उगाच लोभात पडून अशा मेल्सना उत्तर देण्याचे टाळावे, सर्व खातरजमा करावी, त्यानंतरच वैयक्तिक माहिती संबंधितांना द्यावी, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल.

अशी होऊ शकते फसवणूक...

प्रकरण १

एका युवतीने ऑनलाईन वेबसाईटवर नोकरीसाठी अप्लाय केला होता. दोन दिवसांतर संबंधित कंपनीकडून मेल्स आले आणि वैयक्तिक माहिती विचारली. रजिस्ट्रेशनसाठी १० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगण्यात आले. युवतीने पैसे ट्रान्सफर करताच तिच्या खात्यातून ४५ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

प्रकरण २

लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने युवकाने काही कंपन्यांकडे जॉबसाठी अप्लाय केला होता. त्या कंपन्यांकडून युवकाला मेल्स आले. त्याला वर्क फ्राॅम होमसाठी नोकरी आहे असे सांगून ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. पण, काही वेळातच त्याच्या खात्यातून रक्कम लंपास झाली.

प्रकरण ३

मोबाईलवर जॉब लिंक आल्याने महिलेने घरबसल्या नोकरी करण्यासाठी मोबाईलवर आलेल्या लिंकवर जाऊन तेथे सर्व वैयक्तिक माहिती सांगितली. अखेर त्या महिलेला काही रक्कम टाकून नोकरी पक्की करण्यास सांगण्यात आले. महिलेने पैसे भरताच तिच्या खात्यातून काही काही वेळाने रक्कम कपात झाली.

 

............

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम