शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भाव पडल्याने वाटली वांगी

By admin | Published: July 01, 2017 12:31 AM

तालुक्यातील वाबगाव येथील सुगत नारायणे या कास्तकाराने देवळीच्या शुक्रवारी बाजारात मोफत वांग्याचे दुकान लावून प्रशासनाचे लक्ष वेधले.

शासनाचा निषेध : वाबगावच्या पदवीधर कास्तकारांची व्यथा लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : तालुक्यातील वाबगाव येथील सुगत नारायणे या कास्तकाराने देवळीच्या शुक्रवारी बाजारात मोफत वांग्याचे दुकान लावून प्रशासनाचे लक्ष वेधले. वांगे तोडण्यासाठी लागलेली मजुरी व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने या कास्तकाराने मेटॅडोर भरून आणलेली वांगी मोफत वाटली. वारे अच्छे दिन, खाओ गरीबो, अशाप्रकारे व्यथीत अंतकरणाने ओरडून हा कास्तकार शासनाच्या धोरणाचे वाभाडे काढीत होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याची व्यथा म्हणून उपस्थितांसाठी हा क्षण बोलका ठरला. शेतमालाच्या भावाअभावी कास्तकार अडचणीत सापडला आहे. शेतीविषयीच्या धोरणाच्या बदलासाठी शासन तयार होत नसल्याने कास्तकारांची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. कला शाखेत पदवीधर व अल्पभूधारक असलेल्या वाबगावच्या कास्तकाराने शेतमालाचे केलेले दान शासनाचे डोळयात अंजन घालणारे ठरले आहे. नारायणे हा पाच एकराचा कास्तकार असून बागायती शेतीवर त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे. पदवी घेतल्यानंतर त्याने वडिलोपार्जित शेतीला वाहुन घेतले. हळद, वांगी व इतर पिकांना चालना देवून बऱ्यापैकी उत्पन्न घेण्याऱ्यांमध्ये त्यांचे नाव आहे. परंतु गत काही दिवसात शेतमालाच्या भावबाजीच्या लहरीपणामुळे ते पूर्णत: कोलमडले आहे. यावर्षी पाच एकर शेतातील दीड एकरात वांगी व साडे तीन एकरात कपाशीचे पीक घेण्यात आले. कॅश क्राप म्हणून वांगीचे पीक भरभरून आले. यावर दीड लाखांचा खर्च करण्यात आला. दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न होण्याच्या लालसेने पिकाची जोपासना करण्यात आली; परंतु भावबाजीमुळे या उत्पादनाचे ४० हजार सुद्धा हाती येण्याची चिन्हे नसल्याने हा कास्तकार हताश झाला. वांग्याची तोडणी व वाहतुकीसाठी चार हजाराचा खर्च करुन या कास्तकाराने वांग्याची ५५ पोती वर्धा बाजारात नेली. परंतु त्याचे हाती २ हजार ५०० रुपयांचा चुकारा आला. त्यामुळे डोके फिरलेल्या या कास्तकाराने एक मेटॅडोर वांगी देवळीच्या बाजारात आणून फुकटात वाटून दिली.