लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर जि.प. निवडणुकी २०१७ मध्ये आल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक परिपत्रक पुढे करून निवडणुकाचा थांबविल्या. शिवाय पदाचा गैरवापर करून प्रशासक न नेमता जिल्हा परिषदेतील बॉडीला मुदतवाढ दिली. इतकेच नव्हे तर ओबीसींच्या भरोश्यावर भाजपने राज्यात सत्ता भोगली तसेच केंद्रात सत्ता आहे. देशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे धोरण भाजप अवलंबत असून सध्या चोरांचा उलट्या बोंबा होत असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणले, राज्यात फडणवीस सरकार असताना नैसर्गिक पदोन्नती थांबविण्यात आली होती. पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही नैसर्गिक म्हणजे सिनॅरिटीप्रमाणे होणारी पदोन्नतीवर सकारात्मक विचार करून त्यावर कृती केली. काल-परवा देण्यात आलेल्या पदोन्नत्या आम्ही सिनॅरिटीप्रमाणे दिल्या आहेत. आरक्षणावरून पदोन्नतीचा विषय सर्वाेच्च न्यायालयात आहे. घटनात्मक अधिकारी अबाधित राहिले पाहिजे ही काँग्रेसची तसेच महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. अभिजीत वंजारी, माजी आमदार अमर काळे, अतुल लोंढे, रविंद्र दरेकर, मनोज चांदूरकर, शेखर शेंडे आदींची उपस्थिती होती.
२०२४ मध्ये काँग्रेसचा गड कायम ठेऊवर्धा हा काँग्रेसचा गड असून तो सध्या काँग्रेसच्या हाती नसला तरी २०२४ च्या निवडणुकीत कसा परत मिळविता येईल यासाठी पुर्ण ताकदीनिशी प्रयत्न होईल. शिवाय राज्यातील प्रत्येक शासकीय प्राथमिक आरोग्य डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मोदी सरकारने ६ लाख कोंटीचे रस्ते विकलेदोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने सध्या खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. रस्ते विकासाराच्या नावाखाली सध्या केंद्रातील माेदी सरकार १८ रुपये आकारत आहे. शिवाय काही खासगी कंपन्यांना करार तत्वावर रस्ते देण्यात आले आहेत. मोदी सरकारने सहा लाख कोटींचे रस्ते खासगी कंपन्यांना विकल्याची टिका केली.
मराठा समाजाला आरक्षण द्या : पटोलेंना साकडे हिंगणघाट : मराठा समाज, हिंगणघाट व शिवकल्याण मराठा ब्रिगेडच्यावतीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच हिंगणघाट शहरातील असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी त्याठिकाणी पोलीस गस्त देण्यात यावी. तसेच या उद्यानाचे सौदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. उद्यानात समाजातील गोर गरीब मुलींचे, मुलाचे लग्न व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उद्यानात समाज मंदीराची निर्मिती आदींचा समावेश होता. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन देताना शिवकल्याण मराठा ब्रिगेड अध्यक्ष अक्षय निकम, अमित गावंडे, अक्षय भांडवलकर, प्रविण काळे, अक्षय गायकवाड, अक्षय निकम, अभिजित शिंगारे, आदित्य पालांडे आदींची उपस्थिती होती. सदर विषयी आपण पाठपुरवा करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.