ऑनलाईन लोकमतवर्धा : शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाजने मंगळवारी शिवाजी चौक परिसरातून भु-देव पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा मुख्यंमंत्र्यांच्या नागपूर येथील सचिवालयावर धडक देणर आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांनी आपला आवाज बुलंद केला असून शुक्रवारी ही यात्रा नागपूरात दाखल होणार आहे.या यात्रेत सहभागी होण्याकरिता स्थानिक छत्रपती शिवाजी पुतळा चौकात सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी ९ वाजतापासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया जिल्ह्यातील कुटुंबियांनी एक-एक करीत एकत्र होण्यास सुरुवात केली होती. दुपारी १२ वाजता अतिक्रमण धारकांची ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.या पदयात्रेचे नेतृत्त्व युवा परितर्वन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, पलाश उमाटे करीत आहेत. २३ मार्चला ही पदयात्रा नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवावर धडक देत अतिक्रमण धारकांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहे. या भू-देव यात्रेत जिल्ह्यातील अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.आरोग्य विभागाची चमूही यात्रेतभू-देव यात्रेत सहभागी कुठल्याही नागरिकाची प्रकृती बिघडल्यास त्याला योग्यवेळी आरोग्य सेवेचा लाभ मिळावी म्हणून या पदयात्रेसोबत आरोग्य विभागाची एक चमू कार्यरत होती. यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
भू-देव यात्रा नागपूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:46 PM
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाजने मंगळवारी शिवाजी चौक परिसरातून भु-देव पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा मुख्यंमंत्र्यांच्या नागपूर येथील सचिवालयावर धडक देणर आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सचिवालयावर देणार धडक