वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या डवलापुर गावातील भोयर दापत्याला पंढरपुरला महापुज़ा करन्याचा मान मिळाला आहे . उपमुख्यमंत्र्यासह ते दापत्य यांनी पूजा पंढरपूरला केली आहे विठ्ठल म्हणजे समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या विठुरायाची पूजा आपल्या हातून व्हावी, असे प्रत्येक भक्ताला वाटते. विठ्ठलाची अशीच भक्ती करणाऱ्या डौलापूर येथील कवडू भोयर यांच्या कुटुंबाला विठ्ठलाच्या प्रथम पूजेचा मान मिळाला. आज गुरुवारी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भोयर दाम्पत्य विठ्ठलाची महापूजा केली आहे.
कार्तिक एकादशीला होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळेला डौलापूर येथील कवडू भोयर व त्यच्या पत्नी कुसुम यांना पूजेसाठी पंढरपूर येथे आमंत्रित केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हे दाम्पत्य आज गुरुवारी पहाटे पंढरपूर येथे शासकीय पूजेत सहभागी होऊन पुजा केली.
परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी दर्शनार्थ्यांच्या रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. मात्र कोरोनामुळे मंदिर बंद आहे. यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्राही मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय महापूजेच्या वेळी प्रथम पूजनाचा मान मंदिरात सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांमधून एकाला देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला. मंदिरात सतत वीणवादन करीत पहारा देणाऱ्या सहा वीणेकऱ्यांमधून कवडू भोयर यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली होती .
कवडू भोयर हे मूळचे डौलापूर (ता. हिंगणघाट) येथील रहिवासी असून पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहे. दरवर्षी वारीला जाणे, पांडुरंगाची सेवा करणे हा त्यांचा दिनक्रम आहे. गेले काही वर्षांपासून ते सपत्निक पंढरपूरमध्ये राहून मंदिरात सेवा देत आहे. त्यांची पत्नी कुसुम भोयर यांचे माहेर हिंगणघाट तालुक्यातीलच घाटसावली गावचे बिडकर घराणे चे आहे . या मिळालेल्या मानामुळे भोयर कुटुंब व आपल्या घरातील मुलगी प्रभू पांडुरंगाच्या पूजेमध्ये पूजेमध्ये सहभागी होण्याच्या बातमीने बिडकर कुटुंब आनंदी झालेले आहे. शासनामार्फत त्यांना पुढील एक वर्ष महाराष्ट्र एसटी बससेवा मोफत मिळणार आहे.कवडूजी भोयर व त्यांची पत्नी यांना दांपत्या कडे बारा येकर शेती आहे व त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे.