ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय जागेवर अतिक्र मण करून राहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी भू-देव यात्रा मंगळवारी काढण्यात आली. युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या भु-देव यात्रेने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. त्यानंतर सदर पद यात्रा नागपूरच्या दिशेने रवाना झाली. यात्रेचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत जिल्ह्यातील अतिक्र मण धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ही भु-देव यात्रा शुक्र वार २३ मार्चला नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयावर धडक देणार आहे.