शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

बर्ड फ्लूने बिघडविले पोल्ट्रीधारकांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:03 PM

Wardha News देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत.

ठळक मुद्देअफवांमुळे धास्तावले पशुसंवर्धन विभागाने काळजी घेण्याचे केले आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत. घाबरू नका, तर पक्ष्यांची काळजी घ्या, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात एकूण बॅकयार्ड आणि ऑर्गनाइझ अर्थात, लहान-मोठे १८४ पाल्ट्रीधारक आहेत. सर्वाधिक व्यवसाय वर्धा, हिंगणघाट आणि देवळी तालुक्यात आहेत. सेलू तालुक्यात ११, आवर्वी १९, आष्टी (शहीद) ४, कारंजा (घाडगे) ८ आणि समुद्रपूर तालुक्यात १थ(??) लहान मोठे पोल्ट्रीधारक आहेत. या सर्व पोल्ट्री व्यवसायात ४ लाख ५४ हजार ८४० कुक्कुट पक्षी आहेत. बर्ड फ्लू हा तापाचा विषाणू आहे. तो विषाणू आपला डीएनए सतत बदलत असतो. हा आजार अचानक सुरू होतो. संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेले पक्षी आजारी पडतात. पाच ते सहा वर्षांपासून सर्व पक्ष्यांचे वर्षातून तीन वेळा लसीकरण करण्यात येते. अंडी, मांस, चिकन किंवा मटण आपल्याकडे १०० अंश तापमानाच्या उकळत्या पाण्यात भरपूर उकडून, शिजवून खातो. ७० अंश तापमानाला बर्ड फ्लूचा विषाणू मरून जातो, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १०६ पशुवैद्यकीय दवाखाने असून, पोल्ट्री व्यावसायिक आणि कोंडी पालन करणाऱ्यांनी या दवाखान्यांशी संपर्क करण्याचे आवाहनही पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

२४ शीघ्रकृती दलाची निर्मिती

बर्ड फ्लूने देशभरात थैमान घातले असून, जिल्ह्यातही या आजाराचा शिरकाव होऊ शकतो. या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने (रॅपिड रिस्पॉन्स टीम) २४ शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, तर जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे.

तालुकानिहाय पोल्ट्री व्यवसाय

वर्धा -५३

देवळी ३४

सेलू ११

आर्वी १९

आष्टी ०४

कारंजा ०८

समुद्रपूर १७

हिंगणघाट ३८

जिल्ह्यात एकूण पोल्ट्रीधारक १८४जिल्ह्यात एकूण कुक्कुट पक्षी संख्या ४.५४८४०

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू