समुद्रपूर व घोराड येथील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - जिल्ह्यात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात समुद्रपूर तालुक्यात भाजपा व शेतकरी संघटनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. घोराड व झडशी येथे दोन्ही जागा काँग्रेसच्या आपसी विरोधी गटाने पटकाविल्या. आज जाहीर झालेल्या निकालातून जिल्ह्यात भाजप व काँग्रेसला संमिश्र कौल मिळाल्याचे दिसून आले.भाजप व शेतकरी संघटनेला प्रत्येकी दोन जागा लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप समर्पित गटाला दोन तर शेतकरी संघटना समर्पित गटाला दोन जागा मिळाल्या. तालुक्यातील नंदोरी, वायगांव (हळद्या), करूर (पवनगांव), मोहगांव ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी शनिवार मतदान झाले. त्याची मोजणी सोमवारी झाली. यात नंदोरी ग्रामपंचायतीत भाजपा समर्पित संजीवनी राऊत (३४८) मते घेत विजयी झाल्या. त्यांनी सुरेन्द्र गवळी गटाच्या सुचिता मधुकर सुमडकर (३३७) यांचा ११ मतांनी पराभव केला. राऊत यांचा हा विजय निसटताच असल्याचे दिसून आले. करूर, पवनगांव येथे भाजपा समर्पित रूपा मल्हार साबळे (१८१) मते घेत विजयी झाल्या. त्यांनी उमाकांत दिनकर साबळे (१३४) यांचा पराभव केला. वायगांव (हळद्या) येथे शेतकरी संघटनेच्या दोन गटांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत उत्तम घुमडे (३५३) विजयी झाले. त्यांनी केशव भोले (२४९) यांचा यांचा १०४ मतांनी पराभव केला. मोहगांव येथे शेतकरी संघटनेच्या विलास नवघरे गटाच्या देवीदास कुडमते (१३९) विजयी झाल्या. तर हरिभाऊ डडमल (१३३) यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.एस. भलावी यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली.
भाजप-काँग्रेसला संमिश्र कौल
By admin | Published: May 30, 2017 1:05 AM