भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:46 PM2018-12-05T23:46:44+5:302018-12-05T23:49:46+5:30

गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही.

The BJP government is only going to declare it | भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही. महाराष्ट्रामध्ये खोट्या थापा मारून सरकार सत्तेवर आहे. कर्जमाफीत सरकार फसले. बोंडअळीचे अनुदान नाही. सर्वच पातळ्यांवर या युती सरकारने सामान्यांची निराशाच केली. हे सरकार घोषणेपलीकडे गेलेच नाही. या खोटारड्या सकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी जनसघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी रात्री आर्वीत दाखल झाल्यानंतर स्थानिक गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे सचिव सुरजेवाला, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, डॉ. आशीष देशमुख, नसीम खान, रणजीत कांबळे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार राजू तिमांडे, शेखर शेंडे, हेमलता मेघे, अ‍ॅड. नंदा पराते, आ. अमर काळे आदी उपस्थित होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा विदर्भाने काँग्रेसने बळ देण्याचे काम केले आहे. युती शासनाने साडेचार वर्षात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हे विचारण्याची वेळ आता आली आहे. सरकारचे ३२ हजार कोटी पेक्षा जास्त बजेट झाले आहे. हा महाराष्ट्र अधिक कर्जात बुडविण्याचे पाप हे युती सरकारचे आहे. हे सरकार फेकू सरकार असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. रामाचं नाव घ्या आणि निवडणुका जिंका हा एकच मंत्र सध्या भाजपा सरकार राबवतय आहे. यापासून आता साधव राहण्याची गरज आहे. कार्यक्रमात तळेगाव येथील शिख बांधवांनी खा. अशोक चव्हाण यांना तलवार भेट दिली. तर तालुक्यातील वाठोडा येथील युवा चित्रपट निर्माता गणेश पाटील यांनी निर्मिती केलेल्या ‘तू तिथे असावी’ या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर खरांगणा येथील भाजपाचे पदाधिकारी मनोज सतीजा व दुर्गा काळे यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी अरूण बाजारे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. आशीष देशमुख, आ. नसीम खान, अ‍ॅड. चारूलता टोकस, बालाजी गाडे, सत्यजीत तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.

निवडणुकीच्या तोंडावर राम आठवतो : अमर काळे
शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर या युती शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणुकीला आल्या की त्यांना राम आठवतो. राम शब्दाचे पक्के होते. रामाचं नाव घेऊन सत्तेवर येणाºयांची रामाच नाव घेण्याची लायकी नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे ‘अबकी बार मोदी सरकार’ तर आता २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकार बस कर यार असा आमचा नारा आहे. या सरकारला निवडणुकीतून धडा शिकविण्याचे आवाहन याप्रसंगी आ. अमर काळे यांनी केले.

Web Title: The BJP government is only going to declare it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.