लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे कायम नोकऱ्या, ग्रॅज्युटी, सुट्या व आदी सुविधा लागू केल्या. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. १९९१ नंतर काँग्रेस सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्विकार करून नोकऱ्यांची समाप्ती केली. पेन्शन बंद केली. आता भाजप प्रणीत सरकार काँग्रेसच्या पलीकडे जाऊन श्रमिकांच्या विरोधी धोरण राबवित आहे. हे सरकार मुठभर उद्योगपती व श्रीमतांचे हित जपणारे सरकार आहे, असे प्रतिपादन सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी केले.माजी खासदार रामचंद्र घंगारे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सीटू राज्य उपाध्यक्ष सईद अहेमद यांनी केले. अध्यक्षस्थानी सीटूच्या जिल्हाध्यक्ष रंजना सावरकर होत्या. यावेळी मंचावर अमृत मेश्राम, कोलमाईन्स सीटूचे कॉमे्रंड बेग, नागपूर, रवींद्र कांबळे, नागपूर, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, दुर्गा काकडे, महेश दुबे, विनोद तडस, अर्चना मोकाशी, येलवटकर, पुरूषोत्तम पार्लेवार, नरेंद्र कांबळे, अर्चना मोकाशी, सुनिल घिमे, छाया बुरबुरे, अर्चना घुगरे, सोमलाल रहांगडाले, डी.एन. हिवरे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक सिताराम लोहकरे यांनी केले. संचालन यशवंत झाडे यांनी केले तर ा आभार कल्पना चहांदे यांनी मानले. वामनराव लांडगे यांनी राष्ट्रवंदना होऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पांडूरंग राऊत, संजय भगत, राहुल खंडाळकर, बाबू समुद्रे, शुभम मानवटकर, प्रमोद घवसेल, राहुल तामगाडगे, दिलीप ठाकूर, संदीप मोरे, अनिता राऊत, प्रितम हिराणी, समीर बोरकर, रामभाऊ ठावरी, संजय भोयर, आदींनी सहकार्य केले.
भाजप सरकारचे धोरण उद्योगपतींच्या हिताचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:37 PM
स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे कायम नोकऱ्या, ग्रॅज्युटी, सुट्या व आदी सुविधा लागू केल्या. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. १९९१ नंतर काँग्रेस सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्विकार करून नोकऱ्यांची समाप्ती केली. पेन्शन बंद केली.
ठळक मुद्देडि.एल. कराड : रामचंद्र घंगारे स्मृतिप्रित्यर्थ कामगार मेळावा