शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:18 PM

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देराज्य सरकारवरही केली टिका

लोकमत न्यूज नेटवर्क   वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.वर्धा येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर आयोजित काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी चव्हाण म्हणाले, देशातील सर्वसामान्यांचा पैसा घेवून पंतप्रधानाचे मित्र देश सोडून गेलेत. देशात ४५ हजार शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत आत्महत्या केल्या. महाराष्ट्रावर ५ हजार कोटीचे कर्ज झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक चार वर्षांत उभे राहू शकले नाही. मात्र भाजपाचे दिल्ली येथे आलीशान कार्यालय उभे झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे. चार वर्षांपूर्वी आम्हाला कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा असे विचारणाºयांना आता महाराष्ट्र कुठे हे विचारण्याची वेळ आली आहे. असे चव्हाण यावेळी म्हणाले.काँग्रेसचा इतिहास बलीदानाचा- गहलोतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास हा बलीदानाचा इतिहास आहे. महात्मा गांधींपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले बलीदान दिले. मागील वेळी लोकांना खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपमुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला सहकार्य करावं असे प्रतिपादन काँग्रेस महासचिव खासदार अशोक गहलोत यांनी सांगितले.लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा - गुलाबनबी आझादखोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पतनासाठी तिरस्काराविरूद्ध लढाई नव्याने सुरू करावी लागणार आहे. आणि हा संकल्प वर्धा व सेवाग्रामवरूनच आपल्याला करावा लागेल, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाबनबी आझाद यांनी केले.करो वा मरो ची लढाई - मल्लीकार्जुन खरगे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात करो आणि मरो चा इशारा दिला होता. आतापुन्हा करो आणि मरोची लढाई करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. दलिताचा आवाज दाबला जात आहे. काँग्रेसने त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटबंदी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते, त्यावेळी या सरकारने काँग्रेसची खिल्ली उडविली होती. परंतू आता नोटबंदी फसली हे समोर आले. हिंसाचाराच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देशात पुन्हा युपीएचे सरकार विराजमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSewagramसेवाग्राम