वर्धा : विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्राचारार्थ शनिवारपासून वर्धा शहर व ग्रामीण भागात जनसंपर्क अभियानास प्रारंभ झाला. दि.५ ला स. ८ ते दु. ३ वाजतापर्यंत सेलू तालुक्यातील कान्हापूर, गोंदापूर, रेहकी, सेलू, सुकळी, मोर्चापूर, वाहितपूर, प्रभाग २ मध्ये दुपारी ४ वाजता स्रेहल नगर, राममंदिर, रत्नीबाई विद्यालय परिसर, लहानुजी नगर, बुरड मोहल्ला, इतवारा बाजार, ६ आॅक्टोबरला स. ८ ते दु. ३ या वेळात म्हसाळा, वरुड, पवनार, नालवाडी व प्रभाग ३ मध्ये दुपारी ४ वाजता गोंडप्लॉट, पावडे नर्सिंग होम, धंतोली, हवालदारपूरा, महादेवपूरा, विठ्ठल मंदिर परिसर तसेच रात्री ७ वाजता झडशी व रात्री ८.३० वा. हिंगणी येथे सभेचे आयोजन आहे. वक्ते म्हणून खा. रामदास तडस व अन्य नेते उपस्थित राहतील. दि. ७ ला स.८ ते दु. ३ या वेळात सेलू तालुक्यातील तळोदी, जयपूर, खडका, चारमंडळ, सेलडोह, केळझर, महाबळा, इटाळा, जंगलापूर, दुपारी ४ वाजता प्रभाग ४ मध्ये लोक महाविद्यालय परिसर, मानस मंदिर, ज्ञानेश्वर नगर, केळकर वाडी, दि. ८ ला स. ८ ते दु. ३ या वेळात बोरगाव, जामठा, कुरझडी, पालोती, सालोड तसेच सायं.४ वा. प्रभाग ५ मध्ये गजानन महाराज मंदिर, साईनगर, देवरणकर ले आऊट, संत तुकाराम वार्ड, वंजारी चौक, सायं. ७ वा. घोराड व रात्री ८.३० वा. येळाकेळी येथे खा. रामदास तडस व अन्य वक्त्यांची जाहिर सभा होईल. दि. ९ ला स. ८ ते ११ वर्धा शहरात पदयात्रा, दुपारी १२ वाजता जुना आरटीओ प्रांगण येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांटी सभा होईल. सायं. ४ वा. प्रभाग ७ मध्ये इंगोले चौक परिसर, मालगुजारीपूरा, कपडा लाईन, पत्रावळी लाईन, पटेल चौक, बजाज चौक पदयात्रा होईल. दि. १० ला स. ८ ते दु. ३ वा. येळाकेळी, सुकळी, जामणी, आकोली, आमगाव, मदनी, क्षीरसमुद्र, बाभुळगाव, सूरगाव, सायं.४ ते ८ वा. प्रभाग ६ मध्ये तुळजाभवानी मंदिर, रामनगर, जैन मंदिर परिसर, एसटी डेपो परिसर, सानेवाडी, गोरक्षण, दि. ११ ला स. ८ ते दु. ३ वा. सावंगी ,उमरी मेघे, सिंदी मेघे, दुपारी ४ ते ८ वा. प्रभाग ८ मध्ये पुलफैल, आनंद नगर, अशोक नगर, दि.१२ ला स.८ ते ३ बढे चौक, सब्जी मंडी, कपडा लाईन, सराफ लाईन, कच्छी लाईन, दुर्गा टॉकीज परिसर, मेन रोड, दु. ४ वाजता प्रभाग ९ व १० मध्ये हनुमान नगर, बोरगाव मेघे परिसर, दयाल नगर, समता नगर आदी हे अभियान होईल. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विरू पांडे, नगरसेवक प्रशांत बुरले, माया उमाटे, शुभांगी कोलते, पवन राऊत, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील.(स्थानिक प्रतिनिधी)
वर्धा व सेलू तालुक्यात भाजपच्या जनसंपर्क अभियानाला प्रारंभ
By admin | Published: October 04, 2014 11:32 PM