लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे असेल तर गांधी घराण्यातच जन्म घ्वावा लागेल, अशी घणाघाती टीका खासदार रामदास तडस यांनी केली.येथील मातृसेवा सभागृहात विविध सामाजिक व राजकीय संस्था तसेच भारतीय जनता पार्टीव्दारे खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार, युथ कार्यकर्ता मेळावा आणि ईद-मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामदास आंबटकर तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगराध्यक्ष शितल गाते, भाजपा ओ.बी.सी. मोर्चाचे प्रदेश सरचिटीस संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलींद भेंडे, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन बडगे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष आशिष गांधी यांची उपस्थिती होती.सत्काराला उत्तर देताना खासदार तडस म्हणाले, भाजपा हा कुण्या एका जाती, धर्म व पंथाचा पक्ष नाही; तो सर्वसामान्य माणसाचा गरीब शेतकºयांचा पक्ष आहे. देशातील १ लाख ४० कंपण्या बंद पडलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करून बेरोजगारांच्या हाताना काम, शेतकºयांच्या शेताला पाणी व शेतमालाला योग्य भाव देवून भाजपा सरकार एक नविन राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. स्थानिक खत कारखाना बंद पडलेला आहे. तो अधिक चांगल्या प्रकारे सुरू करून शेकडो बेरोजगारांना रोजीरोटी देण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस सरकाने सहा दशकाच्या कालावधीत शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या तसेच बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केवळ गांधीजींचे नाव पुढे करुन आपले घर भरण्याचे काम केले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिल्लीच पार्सल दिल्लीला पाठविलं. आता विधानसभेत हैद्राबादचही पार्सल परत पाठवा, असे आवाहन खासदार तडस यांनी केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. आंबटकर म्हणाले की, भाजपाच्या विजयात सर्वात मोठा वाटा आजच्या तरूणाईचा आहे. या सरकार पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छ व समृध्द भारताचा संदेश आहे. तोच संदेश घेवून भाजपा सरकार एक स्वच्छ व समृध्द भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. याप्रसंगी संजय गाते, नितीन बडगे, राजेश बकाने यांनीही मार्गदर्शन केले. तसेच ईद-मिलन कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर खासदार तडस यांचा भाजप नगर परिषद तसेच सर्व सामाजिक व राजकीय संस्था तसेच भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी, उत्तर भारत समाज, पतंजली योग समिती, यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळा व मेळाव्याला नोमान अली बोहरा, अॅड. अजय तिवारी, राजीव बत्रा, गटनेता राजीव जयस्वाल, मनोज वालदे, युसूफभाई, शकील भाई, विठ्ठल वानखेडे, नलिनी ढोबळे, मंगला राठी, गणेश ऐतवान, नगरसेविका माधुरी इंगळे, नगरसेवक भगवान भंडारकर, सभापती पूनम सावरकर, अविनाश भोपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आकाश दुबे यानी केले.
भाजप सर्वसामान्यांचा पक्ष; कर्तृत्ववानाला मिळते संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:06 AM
सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे असेल तर गांधी घराण्यातच जन्म घ्वावा लागेल,.....
ठळक मुद्देरामदास तडस : विविध सामाजिक व राजकीय संस्थांंद्वारे नागरी सत्कार व युथ कार्यकर्ता मेळावा