लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदार संघातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारला आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केल्या जातो. सकाळपासून नागरिक येथे गर्दी करुन आपल्या समस्या मांडतात. आ. भोयरही त्याचंी तात्काळ दखल घेत असल्यानेच ‘आमचे आमदार, कामगिरी दमदार’ असे फलकही शहरात झळकताना दिसत आहे. आज त्यांच्या जनता दरबारात चक्क भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आमदार भोयर यांच्या कार्याबद्दल कौतूकाची थापही ठेवली.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारला वर्धा दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या जनता दरबाराला त्यांनी भेट दिली. जनता दरबारात उपस्थित वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांशी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.दर रविवारी जनता दरबार आयोजित करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून विविध उपक्रमाचीही माहिती आ. भोयर यांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना दिली. त्यांनी आमदारांच्या कार्याबद्दल समाधानही व्यक्त केले. यावेळी आमदार रामदास आंबटकर, विदर्भाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगर पालिका उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, बांधकाम सभापती नौशाद शेख, नगरसेवक निलेश किटे, यशवंत झाडे, माजी नगरसेवक बंटी वैद्य, जगदीश टावरी, गिरीश कांबळे, भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.समस्या शासन दरबारी मांडणारआ.भोयर यांच्या जनता दरबारात बांधकाम कामगार,पोलीस पाटील, आदिवासी समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी आपल्या समस्या व अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. त्या सर्वांच्या समस्या जाणून घेत त्या शासन दरबारी मांडून निराकरण करण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.
आमदाराच्या दरबारात पोहोचले भाजपा प्रदेशाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:25 IST
मतदार संघातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारला आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केल्या जातो. सकाळपासून नागरिक येथे गर्दी करुन आपल्या समस्या मांडतात.
आमदाराच्या दरबारात पोहोचले भाजपा प्रदेशाध्यक्ष
ठळक मुद्देनागरिकांच्या जाणल्या समस्या : उपक्रमाबाबत व्यक्त केले समाधान