लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील श्री क्षेत्र टाकरखेड येथे भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी घंटानाद आंदोलन केलीे.केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्यासाठी यापूर्वीच परिपत्रक जारी केलेले असून महाराष्ट्र वगळता देशातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना संकटकाळातील सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे, ही सर्वांची मागणी असतानाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार केचे यांनी केला.आमदारांनी टाकरखेड येथील लहानुजी महाराज देवस्थानाच्या बंद प्रवेश्द्वारावर ‘घंटानाद’ करून ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत आंदोलन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि. प. सदस्य कांचन नांदुरकर, पंचायत समिती हनुमंत चरडे उपसभापती शोभा मनवर, सदस्य धर्मेंद्र, भाजप आर्वी तालुका अध्यक्ष प्रशांत वानखेडे, बाळा नांदूरकर, जयंत येरावार, देवीदास शिरपूरकर, सचिंद्र कदम, अश्विन शेंडे, रवींद्र वाणे, कुणाल कोल्हे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टाकरखेड येथे भाजपचे ‘घंटानाद’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 5:00 AM
भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना संकटकाळातील सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे, ही सर्वांची मागणी असतानाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार केचे यांनी केला.
ठळक मुद्दे‘उद्धवा दार उघड आता दार’ दिली हाक : मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप