वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार गट आणि काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचेही काही संचालक निवडून आले होते. यावेळी सभापती-उपसभापतिपद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. परंतु, सभापतींवर अविश्वास आणल्यानंतर सहकार गटातील काही संचालकांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपचे नेतृत्व स्वीकारले. हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत मोठा विश्वासघात झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने संपूर्ण बळ एकवटून बाजार समितीतून भाजपचा सुपडासाफ केला.
यामध्ये पवन सुरेशराव गोडे यांना ४७१, विशाल विनोद तिवारी १७६, महेश अमरचंद भुतडा १५२, उमेश गोपाळराव जिंदे ४१७, मुकुंद शंकरराव बेलखडे २९, प्रफुल्ल शंकरराव कुचेवार ३२१, वैशाली अनिल उमाटे ३३७, सोनल अमोल भोगे ३३३, डॉ. संदीप सुरेश देशमुख ३४७, विलास अन्नाजी मेघे ३०३, अमित मनोज देशमुख २९०, साहेबराव रामभाऊ भोयर २९३, अमित अरुणराव गावंडे २९०, रमेश विठोबा मोंढे २८९, पुरुषोत्तम पंढरीनाथ टोणपे २८८, दिनेश कृष्णराव गायकवाड ३८२ व संदीप मोतीराम शिंदे यांना ३६३ मते मिळाली. या सर्वांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हा निबंधक प्रकाश भजनी यांनी जबाबदारी सांभाळली.