आॅनलाईन लोकमतवर्धा : हिंगणघाट - गीमाटेक्स्टच्या वर्धा मार्गावरील सीएसटी प्लँट बेला येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास स्फोट झाला. यात सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले. सदर युनिट ‘अंडर ट्रायल’ असल्याने मागील २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे सुदैवाने जीवहानी टळली. याबाबत व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील बेला शिवारात स्थापित टेक्सटाईल पार्कमध्ये हा अपघात झाला. सुमारे १५ कोटींच्या या प्रकिया उद्योगात सरकीपासून तेल व डीओसी वेगळे करणारे चीनी बनावटीचे ‘एस्पँक्टर’ परीक्षणात असताना हा अपघात झाला. रेल्वे गाडीच्या डब्यासारखे दिसणारे सदर संयंत्र मागील दोन-तीन महिने सुरू होते; पण १ नोव्हेंबरपासून युनिट बंद आहे. त्याच्या देखभालीचे काम सुरू असताना बुधवारी अपघात झाला. या बंद संयंत्रात गॅसचा दाब वाढला असता ‘सेफ्टी व्हॉल’ उघडला नाही. यामुळे मोठा स्फोट होऊन परिसर हादरला. सुरक्षेच्या कारणावरून माहिती व फोटो घेण्यासाठी उद्योग परिसरात जाऊ दिले नाही.या नवीन प्लँटमध्ये सर्व सुरक्षा उपाय यंत्रणा असताना हा अपघात झाला. याची चौकशी करून पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दखल घेण्यात येईल.- शाकिर खान पठाण, व्यवस्थापक, गिमाटेक्स कंपनी, बेला (हिंगणघाट).
वर्धा जिल्ह्यातील टेक्सटाईल पार्कच्या सीएसटी प्लँटमध्ये स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 9:58 AM
हिंगणघाट - गीमाटेक्स्टच्या वर्धा मार्गावरील सीएसटी प्लँट बेला येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास स्फोट झाला.
ठळक मुद्देयुनिट ‘अंडर ट्रायल’