आॅनलाईन लोकमतवर्धा : आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया संस्था, कर्मचाºयांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जि.प. आरोग्य विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात आशा स्वयंसेविका यांचा सन्मान, फ्लॉरेन्स नायटींगल पुरस्कार, डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, कुटूंब कल्याणमध्ये उल्लेखनिय कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी तथा कायाकल्प योजनेंतर्गत आरोग्य संस्थेला पुरस्कार देण्यात आले. यंदाचा कायाकल्प व प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुरस्कार साहुर केंद्राने पटकावून कार्यक्रमावरच मोहोर लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तर अतिथी म्हणून सीईओ अजय गुल्हाणे, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य-चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सदस्य संजय शिंदे, धनराज तेलंग, विवेक हळदे, पंकज सायंकार, विमल वरभे, चंद्रकला धुर्वे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, डॉ. विनोद वाघमारे, पं.स. सभापती महानंदा ताकसांडे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. डवले यांनी केले. या पुरस्कार वितरणाचा उद्देश व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे कार्य त्यांनी यातून सांगितले. यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महिलांवरील जबाबदाºया वाढत असताना त्यांनी आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ गृहिणीच नव्हे तर कार्यालयीन महिला कर्मचाºयांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सभापती गफाट यांनी सांगितले. जि.प. अध्यक्ष मडावी यांनी आशा सेविकांचे कार्य हे देशाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात महत्वपूर्ण आहे. यामुळे हा गौरव झालाच पाहिजे, असे सांगितले.यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कायाकल्प पुरस्कारात प्रोत्साहनपर प्राथमिक आरोग्य केंद्र विजयगोपाल, कन्नमवारग्राम, खरांगणा (मो.) यांना मिळाला. डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारांत ग्रामीण रुग्णालय विभागात प्रथम क्रमांक ग्रामीण रुग्णालय पुलगावने पटकाविला. सलग सहाव्यांदा हा पुरस्कार या रुग्णालयाने मिळविला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गटात द्वितीय प्राथमिक आरोग्य केंद्र विजयगोपाल, तृतीय कन्नमवारग्राम, उपकेंद्र गटात प्रथम उपकेंद्र पेठ, द्वितीय नागझरी तर तृतीय आकोलीला रोख व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.नाविण्यपूर्ण आरोग्य सखी पुरस्कार प्रियंका यादव, पुष्पा झाडे यांना प्रदान करण्यात आला. यासह कुटुंब कल्याण योजनेत कार्य करणारे परिचारक, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, रुग्णालय यांनाही रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय जांगडे व रहाटे यांनी केले तर आभार डॉ. राज गहलोत यांनी मानले.सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकाही पुरस्कृतआंजी (मोठी) येथील अनिता चिकराम या जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका ठरल्या आहेत. द्वितीय पुरस्कार पुष्पा जगताप अल्लीपूर यांना देण्यात आला. तालुकास्तरावर उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांनाही पुरस्कार देण्यात आले. कुटंूब कल्याण योजनेत उत्कृष्ट कार्यबाबत डॉ. निरज कदम प्रथम, डॉ. विनोद बेले द्वितीय तर डॉ. अशोक बनकर तृतीय आले. फ्लॉरेन्स नाईटींगल पुरस्कार वसीमा अन्सारी, प्रिया कांबळे, सुशिला बोरवार तर एएनएम गटात वैशाली जुनगडे, वंदना उईके, पूजा वैद्य यांनी पटकाविले.
आरोग्य पुरस्कारांवर साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:31 AM
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया संस्था, कर्मचाºयांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
ठळक मुद्देआनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण कार्यक्रम : पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला सहाव्यांदा पुरस्कार