लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील दोन्ही डोळ्यांनी जन्मता: अंध असलेल्या साहील पांढरे याने एका वाहिनीवर सुरु असलेल्या ‘सुर नवा,ध्यास नवा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या आॅडीशन यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यानंतर गावी परतल्यावर गावकऱ्यांची त्याची मिरवणूक काढून स्वागत केले.साहीलची सुरुवातीला नागपुरातील आॅडीशनसाठी निवड झाली. त्यात त्यांने आपल्या प्रतिभेच्या जोरावर बाजी मारली. येथील २१ मुलांमधून महाराष्ट्रातील पंधरा मुलांची मुंबईकरीता निवड झाली. त्यात साहीलचाही समावेश आहे. मागील दीड महीन्यापासून साहील, त्याची आई या कार्यक्रमासाठी मुबईला मुक्कामी होते. त्याने सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात महान गायक अवधुत गुप्ते, महेश काळे, शार्मली यांच्या उपस्थित ऐका पेक्षा ऐक गीत सादर करुन परीक्षकांची व अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. वाहिनीच्या माध्यमातून घरोघरी हा कार्यक्रम पोहचल्याने साहील सर्वांनाच आपल्या गायकीचे वेड लावले. आज तो दीड महिन्यानंतर मुंबईवरुन आपल्या गावी परतला. गावात येताच गावकºयांनी स्वागत करुन डीजेच्या तालावर मिरवणूक काढली. विरुळ सारख्या लहान गावातून मुंबई गाजवणारा सहिल हा सध्या हिरो ठरला आहे. चार वर्षापूर्वी याच साहिलची यशोगाथा लोकमतने प्रकाशित करुन तो मोठा कलाकार होईल असे भाकीत केले होते,ते आज खरे ठरले. दोन दिवसानंतर तो पुन्हा मुंबईला जाणार आहे.
अंध साहीलचे विरुळात जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:57 PM
येथील दोन्ही डोळ्यांनी जन्मता: अंध असलेल्या साहील पांढरे याने एका वाहिनीवर सुरु असलेल्या ‘सुर नवा,ध्यास नवा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या आॅडीशन यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यानंतर गावी परतल्यावर गावकऱ्यांची त्याची मिरवणूक काढून स्वागत केले.
ठळक मुद्देसूर नवा ध्यास नवा: नागपूर व मुंबई येथून आॅडीशन देऊन परतला