शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी रक्तस्वाक्षरी आंदोलन

By admin | Published: May 03, 2017 12:42 AM

विदर्भ राज्य आघाडी हिंगणघाट-समुद्रपूर तालुका यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वेगळा विदर्भ व्हावा

झेंडावंदनावरून पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांत वाद हिंगणघाट : विदर्भ राज्य आघाडी हिंगणघाट-समुद्रपूर तालुका यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वेगळा विदर्भ व्हावा याकरिता रक्तस्वाक्षरी आंदोलन करीत विदर्भ राज्याचे झेंडावंदन करण्यात आले. महाराष्ट्र दिनी झालेल्या या कार्यक्रमाला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. सकाळपासून सुरू झालेल्या या अभियानात वाढत असलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनसुद्धा दंगल विरोधी पथकासह दाखल झाले. पोलीस प्रशासनाने राष्ट्रध्वजाशिवाय इतर कोणताही झेंडा या ठिकाणी फडकविता येणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते व पोलिसांत शाब्दीक चकमक उडाली. याप्रसंगी आंदोलनाची रूपरेषा समजावून सांगताच पोलिसांकडून सहमती मिळाली. रक्तस्वाक्षरी आंदोलनाचे निवेदन घेऊन शिष्टमंडळ व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते घोषणा देत पायीच उपविभागीय कार्यालयाकडे निघाले. उपविभागीय कार्यालयासमोर अनिल जवादे, मधुसूदन हरणे, गोकुल पाटील, अशोक सोरटे, मंगला ठक यांनी जनतेला रक्तस्वाक्षरी आंदोलनाची रूपरेषा समजावून सांगितली. यानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पाठविण्याची ग्वाही याप्रसंगी देण्यात आली. या आंदोलनात प्रा. भारत पाटील, सीताराम भुते, गोकुल पाटील, रामू सोगे, दिनेश वाघ, मंगला ठक, सुनीता भितघरे, महेश माकडे, गोपाल मांडवकर, जयंता धोटे, समीर शेख, मनोज डबले, नारायण तुपट, हेमंत धोटे, राजेंद्र भोयर, विक्की भितघरे, अजय मुळे, शकील अहमद, प्रवीण हटवार, मंगेश भुते, राकेश जवादे, प्रवीण वासेकर, बंटी रघाटाटे, रहमत खान पठाण, विशाल वरघणे, अशोक मोरे, श्रीकांत वागदे, सुमित महाजन, जर्नाधन तुमाणे, राहुल चंदनखेडे, राहुल गिरडे, नितेश कोहारे, प्रशांत भोयर, निसार शेख, रमेश शेंडे, विजय नानोटकर, महेंद घुले, दिलीप पाटील, सचिन रूईकर, प्रमोद चौधरी, संजय ढोबळे, राहुल दारूणकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)