लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने मियावाकी फॉरेस्टची निर्मिती करण्यात आली आहे. यात जवळपास साडेपाचशे झाडांची लागवड केली असून या झाडांचे उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्याकरिता जमिनीवर वाळल्या गवताचे आच्छादन (मलचिंग) करण्यात आले आहे. तसेच वाया जाणारे पाणीही येथे वळविण्यात आल्याने येथील झाडं अल्पावधीतच घेर घेतांना दिसत आहे.वैद्यकीय जनजागृती मंचाचे ओसाड पडलेल्या टेकडीवर जवळपास ११ हजार वृक्षांची लागवड करुन हिरवळ फुलविली. या कार्यात निसर्गप्रेमींचेही योगदान लाभले. याही पुढे जात नुकताच ३ हजार चौरस मीटरवर स्थानिक सर्व प्रजातींच्या साडेपाचशे झाडांची लागवड केली. ऊन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून पुढेही सुर्य आग ओकणार हे निश्चित.सुर्याची ही किरणं सरळ जमिनीवर पडून झाडांच्या मुळावर आघात करु शकते. ही सर्व झाडं टेकडी परिसरात असल्याने येथे किरणांची तीव्रताही जास्त राहणार आहे. म्हणूनच सूर्य किरणांच्या तीव्रतेपासून या झाडांचे संरक्षण करण्यासाठी मियावाकी फारेस्टच्या परिसरात जमिनीवर वाळलेल्या गवताचे आच्छादन (मलचिंग) करण्यात आले तसेच थंडावा कायम राहावा म्हणून येथील जलशुद्धीकरण केंद्रातील निरुपयोगी पाणी स्पिंकलरच्या माध्यमातून या झाडांकरिता वापरले जात आहे. त्यामुळे अल्पावधीतच मियावॉकी फॉरेस्ट हिरवागार होतांना दिसून येत आहे.या झाडांसह इतरही झाडांचे संगोपण करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचासह त्यांचे सहकारी नियमित परिश्रम घेत आहे.
मियावाकी फॉरेस्टमध्ये गवताचे मलचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:01 PM
येथील हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने मियावाकी फॉरेस्टची निर्मिती करण्यात आली आहे. यात जवळपास साडेपाचशे झाडांची लागवड केली असून या झाडांचे उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्याकरिता जमिनीवर वाळल्या गवताचे आच्छादन (मलचिंग) करण्यात आले आहे. तसेच वाया जाणारे पाणीही येथे वळविण्यात आल्याने येथील झाडं अल्पावधीतच घेर घेतांना दिसत आहे.
ठळक मुद्देजमिनीची धूप थांबणार : साडेपाचशे झाड होताहेत डेरेदार