शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

घाटांचा ताबा मिळण्यापूर्वीच घाटधारकांनी लावल्या बोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 5:00 AM

जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांमध्ये वाळू घाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यातील तब्बल ७७ वाळू घाटांचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाला होता. तालुका सनियंत्रण समितीकडून या सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण करुन त्यापैकी ३९ वाळूघाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले. यापैकी ३६ वाळू घाटांकरिता पहिली लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी जिल्ह्यातील ३९ वाळू घाट लिलावास पात्र ठरले आहेत. यापैकी ३६ वाळू घाटांच्या लिलावाकरिता ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या या लिलाव प्रक्रियेत सहा वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. पण, अद्यापही जिल्हा खनिकर्म विभागाकडून त्यांना घाटांचा ताबा दिला नसला तरी घाटधारकांनी वाळू घाटात बोटी व मशीन लावल्या आहेत. त्यामुळे घाट मिळण्यापूर्वीच अवैध कामाला सुरुवात करणाऱ्या घाटधारकांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांमध्ये वाळू घाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यातील तब्बल ७७ वाळू घाटांचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाला होता. तालुका सनियंत्रण समितीकडून या सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण करुन त्यापैकी ३९ वाळूघाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले. यापैकी ३६ वाळू घाटांकरिता पहिली लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु यामध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ, हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चारच घाटांचा लिलाव झाला. त्यामुळे उर्वरित ३२ घाटांकरिता पुन्हा लिलाव घेण्यात आला असता यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोन घाटांचा लिलाव झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये सहा घाटांचा लिलाव झाला असून आता १५ फेब्रुवारीला ३० घाटांकरिता ई-लिलाव होणार आहे. परंतु पहिल्या व दुसऱ्या फेरीत लिलाव झालेल्या काही घाटधारकांनी अद्यापही जिल्हा खनिकर्म विभागाकडे पैशाचा भरणा करुन रितसर घाटाचा ताबा घेतला नाही. तरीही या घाटांचे आम्ही मालक झालो, या अविर्भावात घाटधारकांनी बोटी आणि मशीन टाकल्या आहेत. काहींनीतर वाळू उपसा सुरु केल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. कोणत्याही यंत्राशिवाय वाळू उपसा करण्यासाठीच शासनाकडून परवानगी दिली जाते. यासह इतर नियम आणि अटींचे पालन करण्याच्या सूचना घाट धारकांना दिली जाते. परंतु, लिलावानंतर सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून वारेमाप वाळूचा उपसा केला जातो. हा प्रकार सध्या नव्याने घाट घेणाऱ्या घाट धारकांनी सुरू करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. यामुळे नदी पात्राचे विद्रुपिकरण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

यंदा वर्षभरासाठी लिलाव- मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर(बाई) व येळी, समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-२ व खुनी या घाटांचा पाच वर्षांकरिता लिलाव झाला होता. यातील खुनी घाटांचे पैसे न भरल्याने तो घाट शिल्लक राहिला. तर  देवळी तालुक्यातील आपटी, हिवरा (का.), समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-१ हे तीन घाट शासकीय कामांसाठी राखीव ठेवले आहेत. याही घाटांचे यावर्षी सर्वेक्षण करण्यात आले आहे. -    यावर्षी ३६ वाळूघाटांकरिता लिलाव प्रक्रिया राबविली असून दोन फेऱ्यांमध्ये सहा घाटांचा लिलाव झाला आहे. या सहा घाटांचा वर्षभरासाठीच लिलाव असून उर्वरित ३० घाटांच्या लिलावाकरिता तिसरी फेरी राबविली जाणार आहे. पण, यातील किती घाट लिलावात जातात, हे लिलावांती कळणार आहे. 

यावर्षी जिल्ह्यातील ३६ वाळू घाटांकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये चार तर दुसऱ्या फेरीमध्ये दोन अशा सहा घाटांचा लिलाव झाला आहे. उर्वरित घाटाकरिता तिसरी फेरी राबविली जाणार आहे. अद्याप घाटधारकांना ताबा दिला नसून कोणी बोटी किंवा मशिनी टाकल्या असेल तर चौकशीअंती योग्य कारवाई केली जाईल.डॉ. अतुल दोड,    जिल्हा खनिकर्म अधिकारी

 

टॅग्स :sandवाळू