लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकासोबतच कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यातच कपाशीच्या झाडाला बऱ्यापैकी बोंडे असली तरी बोंडअळीचे आक्रमणामुळे हे पीक उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. कपाशी पीकावर बोंडअळी येणार नाही अशा फसव्या जाहीराती करून संबंधीत बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली. त्यामुळे ऐन वेळेवर हाती आलेल्या पिकाची माती झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतात हीच परिस्थिती असल्याने शेतकरऱ्यांच्या कपाळावर आड्या पडल्या आहे.शेतकरी दयणे यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे केली असता या विभागाचे एस.डी. गुट्टे, जी.एस. वंजारी व एस.एल.बुधवत यांनी सर्व शेताची पाहणी केली. तसेच याबाबतच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बोंडअळीमुक्तीची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांची फसवेगीरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यंदाही कपाशी पिकावर बोंडअळीचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM
सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली.
ठळक मुद्देदुहेरी संकटात सापडला शेतकरी : कपाशीतून निघताहेत अळ्या