शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

‘त्या’ हाडांचे परीक्षण झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:49 PM

खरांगणा (मो.) नजीकच्या बोरगाव (गोंडी) शिवारातील एका शेतात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात हाडे सापडली होती. ही हाड नेमकी कुठल्या वन्यप्राण्याची आहेत याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ती रिजनरल फॉरेन्सिक प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविली; पण तेथील अधिकाऱ्यांनी आम्ही वन्यप्राण्यांचे डीएनए विश्लेषण करीत नसल्याचे कळविले.

ठळक मुद्देघटना उजेडात येऊन लोटले सात महिने : बोरगाव (गोंडी) येथील अवैध शिकार प्रकरण

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरांगणा (मो.) नजीकच्या बोरगाव (गोंडी) शिवारातील एका शेतात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात हाडे सापडली होती. ही हाड नेमकी कुठल्या वन्यप्राण्याची आहेत याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ती रिजनरल फॉरेन्सिक प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविली; पण तेथील अधिकाऱ्यांनी आम्ही वन्यप्राण्यांचे डीएनए विश्लेषण करीत नसल्याचे कळविले. तर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूरने शरिररचनाशास्त्र विभागात उपलब्ध असलेल्या अपूºया सोयीसुविधांमुळे सदर प्राण्यांचे हाडांचे परीक्षण करून नेमके प्राणी कोणते आहेत हे सांगता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे सध्या वनविभागाच्या अडचणीत भर पडली आहे.सेलू तालुक्यातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्यापूर्वी बोरगाव (गोंडी)सह गरमसूरच्या पलीकडील जंगलात बिटीआर टी-४ या शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य होते. त्याचे दर्शनही काहींना गरमसूरच्या पलिकडील जंगलात झाले होते. तर काही वर्षांपूर्वी एका वाघाच्या जोड्याचेही याच परिसरात वास्तव्य होते. मात्र मागील काही वर्षांपासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. तर वाघाच्या जोड्यातील एक बेपत्ता आहे. त्याची शिकार झाल्याची खमंग चर्चा सध्या होत आहे. बोरगाव (गोंडी) परिसरात मागील अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांची अवैध पद्धतीने शिकार केली जात असल्याचे वनविभागाने वेळोवेळी केलेल्या कारवाईत पुढे आले आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) येथे सापडलेली प्राण्यांची हाडे आणि बेपत्ता झालेले वाघ याचे कुठे सूत तर जुळत नाही ना, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. बोरगाव (गोंडी) येथे मेघराज बापुसा पेठे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हाड असल्याचे २४ डिसेंबर २०१८ ला पुढे येताच ही हाड जप्त करण्यात आली. त्यानंतर १० जानेवारी २०१९ ला रिजनल फॉरेन्सिक प्रयोगशाळा नागपूरच्या नावाने एक पत्र काढून ही हाड १४ जानेवारी २०१९ ला सदर ठिकाणी चाचपडताळणीसाठी देण्यात आली. परंतु, रिजनरल फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडून याच दिवशी सदर वन्यप्राण्यांचे डीएनए विश्लेषण करीत नसल्याचे कळविण्यात आले. शिवाय काही मार्गदर्शक सूचना वनविभागाच्या अधिकाºयांना देण्यात आल्या. त्यानंतर सहाय्यक अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या नावाने ३१ जानेवारी २०१९ ला पत्र काढून जप्त करण्यात आलेली ही हाड ७ फेब्रुवारी २०१९ ला सदर ठिकाणी देण्यात आली. याच दिवशी पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्याकडून आमच्या शरिररचनाशास्त्र विभागात उपलब्ध असलेल्या अपुºया सोयीनुसार सदर प्राण्याच्या हाडाचे परीक्षण करून ती कुठल्या प्राण्याची आहे हे सांगता येणार नसल्याचे वनविभागाला कळविले. त्यामुळे सध्या कुठली कार्यवाही करावी, असा प्रश्न वनअधिकाºयांना सतावत आहे.बोरगाव (गोंडी) येथे आढळलेल्या प्राण्यांच्या हाडांचे परिक्षण होऊन ती हाड कुठल्या वन्यप्राण्याची आहे यासाठी आम्ही नागपूरच्या दोन कार्यालयांशी संपर्क करून प्रयत्न केले. परंतु, अद्यापही या हाडांचे परीक्षण झालेले नाही हे खरे आहे. योग्य वेळी योग्य कार्यवाही करण्यात येईल.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.बोरगांव (गोंडी) येथे सापडलेल्या हाडांचे परिक्षणच झाले नसल्याचे माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनंतर उघडकीस आले आहे. सुरूवातीला माहिती अधिकाराचा अर्ज निकाली काढण्यासाठी टाळाटाळच करण्यात आली होती. परंतु, अपिल केल्यानंतर काही माहिती प्राप्त झाली. त्याचे अवलोकन केले असता धक्कादायक बाबच उजेडात आली आहे.- ताराचंद चौबे, जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.बोरगाव (गोंडी) येथे सापडलेल्या हाडांचे परिक्षण सात महिने लोटूनही झाले नसेल तर ही बाब अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. वन्यप्राण्यांच्या हाडांचे किंवा मासांचे नमुने ओळखण्याची स्वयंत्र्य यंत्रणा भारतीय वन्यजीव संस्थान देहरादून येथे आहे. त्याठिकाणी किंवा हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत ही हाड पाठविणे योग्य राहील. तसेच विस्तूत माहिती मिळणे शक्य होईल. प्रत्येक वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या उद्देशाने वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकरणी योग्य कार्यवाही केली पाहिजे.- कौस्तुभ गावंडे, वन्यप्राणी मित्र, वर्धा.

टॅग्स :forest departmentवनविभाग