लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/झडशी : शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. असाच प्रकार सेलू तालुक्यात घडत आहे. बोरखेडी (कला) ते सालई (कला) रस्त्यावर अवकळा आली आहे. हा रस्ता बोर व्याघ्र प्रकल्प तथा कारंजा तालुक्यात शिरण्यासाठी कमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.झडशी, बोरखेडी कला मार्गे सालई (कला) हा सेलू येथून बोर व्याघ्र प्रकल्प आणि कारंजा तालुक्यात प्रवेश करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे. इतकेच नव्हे तर माजी जि.प. अध्यक्ष यांच्या गावात जाणारा हा रस्ता आहे. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या हस्ते या मार्गाचे खडीकरण तथा काही अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आमगाव, नवरगाव, माळेगाव (ठेका) या परिसरात गवळी समाज अधिक आहे. त्यांना दररोज वर्धा-सेलू शहरात दूध विक्रीस जाण्यास सोईचे झाले होते; पण या मार्गावर कुठल्याही अधिकारी व नेत्याचे लक्ष दिसत नाही.बोर व्याघ प्रकल्प झाल्यापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बोरखेडी-सालई रस्ता जंगल भागातून गेला आहे. यामुळे नागरिकांना जंगल सफारीचा आनंद मिळतो. या मार्गाने वन्य प्राण्यांचे दर्शन होते. काही वर्षांपूर्वी हा रस्ता वाहून गेला होता. संबंधित विभागाच्या अधिकाºयांची भेट घेत विचारणा केली असता पूल व रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली होती; पण जंगलातील ५०० मिटर रस्त्यासाठी वनविभागाने आडकाठी आणली. यातही सामंजस्याने रस्ता दुरूस्त केला गेला; पण त्यानंतर कुणीही फिरकले नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावर खड्डे पडले असून पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.सळाखी उघड्या पडल्याने अपघाताचा धोकासालई (कला) ते बोरखेडी (कला) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर असलेल्या पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. परिणामी, पर्यटकांनाच सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
बोरखेडी ते सालई (कला) रस्त्याला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:20 AM
शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात.
ठळक मुद्देबोर प्रकल्पासाठी कमी अंतराचा मार्ग : पर्यटकांना होतोय सर्वाधिक त्रास