बनावट परवान्यावर सागवानाची तोड : एकाच्या घरात सापडले कोरे कटाई आदेशआकोली : बनावट दस्तावेज तयार करून सुसुंद शिवारात रामा तानबा नेहारे यांच्या शेतातील सागवानाची तोड करणाऱ्या तिघांंवर वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांच्या तक्रारीवरुन शनिवारी खरांगणा पोलिसात शेख हनीफ शेख नबी रा. मासोद, धनराज औजेकर रा. पिंपळखुटा, विरेंद्र सुराणी रा. लकडगंज नागपूर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यातील मुख्य आरोपी शेख हनिफ शेख नबी याला अटक करण्यात आली आहे, तर धनराज औजेकर यांच्या घराची घरझडती घेतली असता कोरे कटाई आदेश व इतर कागदपत्र आढळून आले. त्यालाही ताब्यात घेतले असून सायंकाळपर्यंत अटक दाखविण्यात आली नव्हती. अटकेत असलेल्या आरोपीला ३ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बनावट सर्व्हे व कटाई आदेश तयार करून शेतकऱ्याला अंधारात ठेवत त्याच्य्या शेतातील सागवृक्षाची कटाई केल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघड झाला आहे. यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांवी व्यक्त केला असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.(वार्ताहर) क्षेत्र सहायक व वनरक्षक संशयाच्या घेऱ्यात बोरगाव गोंडीचे क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकाच्या मागे ससेमीरा लागण्याची वनवर्तुळात चर्चा आहे. सुसंद या त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वृक्षतोड सुरू असताना त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे.कटसाईजचा व्यवसाय चालतो बिनबोभाट सुसंद व इतर गावात छोट्या आऱ्यावर कटसाईज तयार करून देण्याचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. जंगलातील सागाची अवैध तोड करून दारे, खिडक्या, चौपट, सोफासेट, दिवान व इतर लाकडी वस्तू तयार करून देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
मुख्य आरोपीसह दोघांना अटक
By admin | Published: June 01, 2015 2:16 AM