लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परिवारातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता मुलानेच घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला बेड्याही ठोकल्या.नरेश कवडूजी मुडे रा.निंबोली (शेंडे) ता. आर्वी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील रहिवासी नंदा कवडूजी मुडे या परिवारासह बाहेरगावी गेल्या असता त्यांच्या घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. १२ जानेवारीला याची तक्रार नंदा मुडे यांनी आर्वी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता त्यांचा मुलगा नरेश हाच चोर असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला अटक करुन विचारपूस केली असता त्याने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने पोपटपंछी सुरु केली.त्याला अटक करुन चोरीस गेलेला सर्व ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संपत चव्हाण यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरिक्षक गोपाल ढोले, अमित जुवारे, विक्की मस्के, राजेश राठोड, गजानन लामसे, विशाल मडावी, चंदु वाढवे, भुषण निघोट, अतुल भोयर, धिरज मिसाळ यांनी केली.
मुलगाच निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:31 AM
परिवारातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता मुलानेच घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला बेड्याही ठोकल्या.
ठळक मुद्देबारा तासात ठोकल्या बेड्या : चोरीतील ऐवज केला जप्त