शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

पवनारात सेवा सोसायटीच्या निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Published: June 15, 2017 12:47 AM

पवनार विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम चुकीचा व दिशाभूल करणारा जाहीर केल्याचा आरोप करीत

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पवनार विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम चुकीचा व दिशाभूल करणारा जाहीर केल्याचा आरोप करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे. तसेच या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मतदारांमध्ये वसंत उमाटे, जगदीश वाघमारे, अशोक हिवरे, नारायण देशमुख, रवींद्र बोकडे, अशोक भट, मुरलीधर वैद्य, अब्दुल मुनाफ अब्दुल अजीज, महादेव देवतळे यांच्यासह १४ मतदारांचा समावेश आहे. पवनार विविध सेवा सहकारी सोसायटीचा निवडणूक कार्यकारी जाहीर करण्यात आला. तो चुकीचा व दिशाभूल करणारा असून सदर कार्यक्रम पत्रिकेत सर्वसाधारण गट असा उल्लेख केला. उमेदवारी अर्ज भरताना विचारणा केली असता तीन वेळा सर्वसाधारण गटात कुणालाही अर्ज भरता येतो असे सांगून उपविधीबाबत काहीही सांगितले नाही. उपविधीत सर्वसाधारण कर्जदार गट असा उल्लेख असताना हेतूपुरस्पर निवडणूक कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख न करता सर्वसाधारण गट असा उल्लेख केला. या गटातील अर्ज फेटाळल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. सेवा सहकारी संस्थेच्या उपविधीप्रमाणे १३ पैकी ८ संचालक हे सर्वसाधारण कर्जदार गटातून तर पाच संचालक हे राखीव जागांमधून निवडावयाच्या आहेत.बहिष्कार टाकणाऱ्या गटाच्या उमेदवारांचे ८ अर्ज फेटाळण्यात आले. आपल्याकडे अपील करण्यात आली. त्यातही ते फेटाळण्यात आले. उपविधीनुसार अर्ज भरण्यात आले नव्हते. - ए.बी.कडू, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, वर्धा