शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

कृपलानीचे अतिक्रमण तोडा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:22 AM

पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे .......

ठळक मुद्देशिवा संघटनेची मागणी : पालिकेला दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे शहर कार्यालयीन मंत्री सुरेश पट्टेवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी यांनी पालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या इमारतच नाही तर हॉटेलचीही निर्मिती केली. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने व्युमेन्स ऐज्युकेशन सोसायटीतील सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी पालिकेकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली. तसेच अ‍ॅड. रविंद्र गुुरु यांनी जिल्हाधिकारी प्रशासन व नगरपालिकेला ८० सेक्शन अन्वये व ३०४ सेक्शन अन्वये दोन वेळा नोटीस दिली.सोबतच सुरेश पट्टेवार यांनीही १६ नोव्हेंबरपासून या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करीत आहे. परंतू नगरपालिका प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे केसरीमल शाळेतील अडीच हजार विद्यार्थिनींच्या जिवाला धोका असून तात्काळ हे अतिक्रमण पाडावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पट्टेवार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांसह जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हशहरातील मार्केट परिसरातील सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करणाºया मुख्याधिकारी धनदांडग्या कृपलाणीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. १० जानेवारीच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्याधिकारी आता मौन पाळून आहे. शहरात दबंग अधिकारी म्हणून मुख्याधिकाऱ्यांची ओळख असतानाही ८२ दिवस लोटूनही कारवाई झाली नसल्याने ही दंबगगिरी कशामुळे शांत झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. नगररचनाकार नेरकर यांची अचानक सातारा येथे बदली करण्यात आली. त्या पाठोपाठ मुख्याधिकाऱ्यांची बदली होणार का? असे अनेक प्रश्न पट्टेवार यांनी निवेदनातून विचारले आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलनाउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेच्या समोर १०० मीटर परिसरात शांतता झोन असल्याने तेथे व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु कृपलाणी यांनी शाळेसमोरच मोठे हॉटेले विनापरवानगी उभारुन न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. तसेच नगरपालिकेने कारवाई करण्याची गरज असताना पालिकाही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्याकरिता पालिकाही सहकार्य करीत असल्याचे दिसून येते, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण