लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण परिसरातून गेलेल्या या रस्त्यावरून घोराड. खापरी, शिवणगावचे नागरिक येजा करतात. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कडा भरतांना कोणताही तांत्रिक निकष पाळले नाही परिणामी कडा भरण्यासाठी वापरलेले साहित्य ढासळून वाहून गेले. एवढेच नव्हे तर पुलाला ही धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर काम करून या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला. वाहून गेलेल्या पुलाच्या बाजुच्या कडा सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंती मजबूत बांधाव्या अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण भागात रस्ते दुरस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत असतो. गेल्या काही वर्षात रस्ते व पुल बांधकामासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.सदर पुलाच्या बाजुला भरावा भरण्यात आला. त्या ऐवजी काँक्रिटची सुरक्षा भिंत आवश्यक आहे. बराच भाग वाहून गेला. राहिलेला वाहून गेला तर रहदारीला धोका निर्माण होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी.-विजय जयस्वाल, माजी अध्यक्ष जि.प.वर्धा.
घोराड-खापरी-शिवनगाव मार्गावरील पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:58 PM
घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.
ठळक मुद्देविजय जयस्वाल : सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंत बांधावी