लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे. आज समाजात त्यांच्या अनुकरणाची गरज आहे व जे काही ग्रंथपाठ आपण याठिकाणी करतो ते प्रत्यक्षात चरित्रात व आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. गौतम बुद्ध राजघराण्यातील होते, शासक होते परंतु समाजाला दिशा देण्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून धम्म म्हणजेच धर्माचा उपदेश देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केले.पिपरी पुनर्वसन येथील सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वर्षावासात याठिकाणी ३ महिने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. वषार्वास समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश अग्रवाल उपस्थित होते. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण महेंद्र्र मात्रे व शेषराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले. उपासक सचिन दहाट, अर्चना सचिन दहाट, शीमा काळे, सविता दहाट, नामदेव खोब्रागडे, इंदू मात्रे व अन्नु दहाट यांनी उर्वरित ग्रंथ वाचन केले व बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. यावेळी डॉ. प्रा.अनिल दहाट, प्रा.काळे, प्रा.मानकर व शैलेश अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अग्रवाल म्हणाले की, विपष्नासाठी विश्व विख्यात इगतपुरीच्या केंद्राचे संस्थापक सत्यनारायन गोयणका अग्रवाल समाजाचे होते याचा आम्हाला अभिमान असून शांतीच्या मार्गदर्शक समाज मूल्यांचा स्वागतकर्ता गुरु गोयनकांचा माझा समाज आहे. आजही त्यांच्या पत्नी इगतपुरीचे केंद्र संचालन करीत असल्याचे अग्रवाल यांनी संगितले.अनिल दहाट सर्व उपासकांचे अभिनंदन करतांनी म्हणाले, आधीच्या काळात शेतीची कामं करून थकून आल्यावरही स्त्रिया ग्रंथपाठ करायच्या त्याचप्रमाणे सचिन व अर्चना यांनी नौकरी व दैनंदिन जवाबदारी पूर्ण करून ग्रंथपाठ केला आहे. शैलेश अग्रवाल बौद्ध व धम्म यात आस्था ठेवतात आणि ज्याप्रमाणे गौतम बुद्ध राजसी वैभव सोडून समाजातील कष्ट दूर करण्यासाठी निघाले होते त्याचप्रमाणे शैलेश अग्रवाल अति संपन्न असूनही संपन्नतेचा उपभोग घेण्याच्या वयात आणि काळात धम्म प्रचारक भंते समान शेतकऱ्यांंची अर्थक्रांती घडविण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मात्रे यांच्यासह राजेश शिरगरे, वसंत मंडवे, शैलेश तलवारे, विकास गोहेकर, पांडुरंग मलीये, जयशीव तांबेकर, दिवाकर पांढरे, निलेश घुगरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
बुद्ध हा एक विचार, जीवन जगण्याची कला व सर्वोत्तम संस्कार आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 10:29 PM
बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे.
ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षवास समारोपीय कार्यक्रम