शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 9:57 PM

राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले. येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देवैशाली डोळस : जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले.येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आनंद महाथेरो (दिल्ली) होते. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांच्या हस्ते झाले. मुख्य मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, साहित्यिक अँड. वैशाली डोळस, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. सुभाष खंडारे, राजाभाऊ ताकसाडे, सुनील ढाले, निगोट, बी.एस.पाटील, प्राचार्य आर. के. पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक भदंत राजरत्न व स्वागताध्यक्ष गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्रियाला स्वातंत्र्याचा हक्क देणारा बौद्ध धर्म हा जगातला पहिला धर्म आहे, समानता हा धम्माचा पाया असून प्रत्येकाचा सन्मान हे धम्माचे मूल्य आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची सुरुवात भदंत सत्यानंद महाथेरो येनाळा, अरण्यवास यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना करुन झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बुध्द वंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उदघाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून गोरख भगत यांनी डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित असणाऱ्या समाजाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. उद्घाटक अनिल जवादे यांनी बौध्द धम्म हा लोकांना जोडणारा आहे, असे सांगितले.राजरत्न आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा बहिष्कृत संघटनेच्या स्थापणेपासून बुद्धीष्ट सोसायटीपर्यंतच्या इतिहासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत महाथेरो यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात याची माहिती दिली. यानंतर संविधान भारती संच नागपूर यांचा बुध्द भीम गितांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर.के. पाटील, उपप्राचार्य एच. पी.गुडधे, उपमुख्याध्यापक एस.एम.राऊत, पर्यवेक्षक दिनेश वाघ, डब्ल्यू. एन.पडवे, एस. ए.बनसोड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. धम्म परिषदेला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुवर्ण महोत्सवी समारोपीय कार्यक्रमहिंगणघाट - स्थानिक डॉ. बी. आर.आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार ४ नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धम्म परिषद, स्नेह संमेलन घेण्यामागील भूमिका प्राचार्य आर.के पाटील यांनी विशद केली. प्रसिद्ध साहित्यिक ना .गो .थुटे यांनी विद्यार्थ्यांना माता,पिता व गुरू यांचा सन्मान करावा, ज्ञानाची तृष्णा, गुरुवर निष्ठा व अध्ययनात सातत्य असेल तरच विद्यार्थी घडतो असे सांगितले. व्यासपीठावर अशोक जवादे, प्रशांत जवादे, रमण जवादे, मंदाकिनी जवादे, अनुराधा जवादे, खोब्रागडे, गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विचाराने, कृतीने व स्वत:च्या प्रयत्नाने चांगलें नागरिक बनावे तसेच वैचारिक दृष्टीने समृद्ध नागरिक बनविणे हेच संस्थेचे ध्येय आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्याने विदर्भ राज्य निर्मिती- घटनात्मक तरतुदी या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संचालन व आभार प्रा.उमेश ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेतील सर्वं विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.