लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील विकास कामांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली. त्यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे उपस्थित होते. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात रस्त्याची कामे करण्यात येणार आहे. यासाठी हा निधी खर्च होणार आहे. विविध गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार असून त्यामुळे नागरिक व शेतकºयांना लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपसभापती धर्मेद्र राऊत, अनिल जोशी, प्रशांत ठाकरे, विजय बाजपेयी, मिलींद हिवाळे, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
५८ कोटींच्या कामांना अर्थसंकल्पात मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:50 AM
आर्वी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील विकास कामांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली.
ठळक मुद्देदादाराव केचे यांची माहिती