लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील पुलगाव येथे अतिरीक्त तहसील कार्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २० सप्टेंबरला घेतला आहे. पुलगाव भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने तेथे अतिरीक्त तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याकरिता तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगांव भागातील जनतेला विविध कामासाठी सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु अद्यापही पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय सुरु न झालेले नाही. नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर विषयी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे यावेळी खा. तडस यांनी सांगितले. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले की, शासन निर्णय निघाल्यानंतर विधानसभेची आचार संहिता लागली. त्यामुळे संबधीत अपर तहसील कार्यालयचे कार्य प्रलंबीत राहिले. सध्या विधानसभेची आचार संहिता संपली असून पुलगाव येथे अपर तहसील कार्यालय त्वरीत सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्तांना माहिती सादर करुन लवकरच कार्यालय सुरु करण्यात येईल, असे सांगितले.
पुलगावात अतिरिक्त तहसील कार्यालयाची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM
जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगांव भागातील जनतेला विविध कामासाठी सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु अद्यापही पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय सुरु न झालेले नाही.
ठळक मुद्देखासदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना